सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार...', दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा
  • एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा
  • दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
  • बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर हेमा मालिनींचा संताप; म्हणाल्या – “हे अत्यंत बेजबाबदार आहे!”
  • दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर पुण्यात हाय अलर्ट; रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात बंदोबस्तात वाढ
  • दिल्ली बॉम्बस्फोटानंतर राज्यभरात अलर्ट, मुंबई पुण्यासह नागपुरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
 शहर

'एनसीईआरटी'च्या ‘गणितप्रकाश’ पुस्तकाचे पुण्यात स्वागत ! भारतीय गणिताचा प्रवास आला सातवीच्या पुस्तकात

डिजिटल पुणे    11-11-2025 12:20:08

पुणे : एनसीईआरटी तर्फे सातवीतील विद्यार्थ्यांना ‘गणितप्रकाश’ पुस्तकाची दुसरी आवृत्ती सादर करण्यात आली असून त्यात भारतीय गणिताचा प्रवास अधोरेखित केला आहे.पुण्यातील गणितप्रेमींनी त्याचे स्वागत केले आहे.'अंकनाद' अंकलिपी,'गणितालय' आणि  ‘लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मिकरण स्पर्धा’ हे उपक्रम आयोजित करणाऱ्या मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे संचालक मंदार नामजोशी,प्रा.डॉ.सुधाकर आगरकर,मराठी काका उर्फ अनिल गोरे,उद्योजक पराग गाडगीळ यांनी यासंबंधी पत्रक प्रसिद्धीस देऊन आनंद व्यक्त केला आहे.  

मॅप एपिक कम्युनिकेशन्सचे  संचालक मंदार नामजोशी म्हणाले, “भारतीय गणिताचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे. आजच्या पिढीला गणित फक्त आकड्यांचा खेळ वाटतो, परंतु या पुस्तकाच्या माध्यमातून गणितामागील विचार, तत्त्वज्ञान आणि संस्कृती समजण्याची नवी दृष्टी मिळेल.”

मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांमधील गणितभय कमी करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. ९० टक्के विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी भीती आढळते. ही भीती कमी करून गणिताशी त्यांची मैत्री व्हावी, या हेतूने संस्थेने विविध उपक्रम राबवले आहेत. या प्रयत्नांना या पुस्तकाने बळ मिळाले आहे,असेही त्यांनी नमूद केले. 

अपूर्णांकांचे पाढे हे भारतीय गणिताचे अनमोल वैशिष्ट्य असल्याचे डॉ.सुधाकर आगरकर  यांनी नमूद केले. राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स यांनी संयुक्तपणे ‘लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मिकरण स्पर्धा’ हा अभिनव उपक्रम राबवला आहे. गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांत या स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाले असून आतापर्यंत सुमारे १,५०,००० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे,हे प्रयत्न भारतीय गणितासाठी उपयुक्त आहेत,असे त्यांनी सांगितले.

मराठी काका उर्फ अनिल गोरे म्हणाले, “अपूर्णांकांचे पाढे हे आपल्या सांस्कृतिक परंपरेचा भाग आहेत. पूर्वी संध्याकाळी पाढे म्हणण्याची परंपरा होती. या परंपरेचा लोप झाल्याने भाषिक गणिताची पकड कमी झाली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी भीती निर्माण झाली. मॅप एपिकचे उद्दिष्ट या परंपरेला नव्या रूपात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून गणित आनंददायी बनवणे आहे.”'भारतीय गणिताच्या समृद्ध परंपरेचा गौरव करणारे ‘गणितप्रकाश’ हे पुस्तक आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताची मैत्री वाढविणारे  प्रयत्न हे शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची 'प्रतिक्रिया उद्योजक पराग गाडगीळ यांनी व्यक्त केली. 


 Give Feedback



 जाहिराती