मुंबई : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटात अनेक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X (ट्विटर) वरून या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेली स्फोटाची घटना हृदयत्रावक आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांना माझी श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांप्रति मनःपूर्वक सहवेदना व्यक्त करतो.”या स्फोटानंतर दिल्लीसह मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या असून, दिल्ली पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) यांच्याकडून घातपाताच्या शक्यतेची चौकशी सुरू आहे.