सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार...', दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा
  • एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा
  • दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
  • बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर हेमा मालिनींचा संताप; म्हणाल्या – “हे अत्यंत बेजबाबदार आहे!”
  • दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर पुण्यात हाय अलर्ट; रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात बंदोबस्तात वाढ
  • दिल्ली बॉम्बस्फोटानंतर राज्यभरात अलर्ट, मुंबई पुण्यासह नागपुरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
 विश्लेषण

दिल्ली स्फोट: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले,हृदयद्रावक घटना, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भीषण कहाणी

डिजिटल पुणे    11-11-2025 12:43:53

दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी (ता.१०) संध्याकाळी झालेल्या भयंकर स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात अफरातफरी माजली होती. प्रत्यक्षदर्शींनी या भीषण प्रसंगाचे वर्णन करताना सांगितले की, “एकच मोठा आवाज झाला आणि काही क्षणातच सर्वत्र धूर, ज्वाळा आणि मानवी शरीराचे तुकडे विखुरलेले दिसले.”

घटनास्थळी घबराट

शहाजहानच्या कारकिर्दीत हे मंदिर पूजास्थळ म्हणून बांधले गेले असे मानले जाते. सोमवारी संध्याकाळी स्फोट झाला तेव्हा मंदिरात एक छोटासा विवाहसोहळा सुरू होता. "आम्हाला खूप मोठा आवाज ऐकू आला. सुरुवातीला आम्हाला वाटले की सिलिंडरचा स्फोट झाला आहे, कारण त्या परिसरात अनेक अन्न आणि पेय पदार्थांची दुकाने आहेत. जेव्हा आम्ही बाहेर पळत गेलो तेव्हा आम्हाला कारचे भाग इकडे तिकडे विखुरलेले दिसले आणि नंतर मानवी मांस आणि शरीराचे अवयव परिसरामध्ये विखुरलेले दिसून आले," असे परिसरातील प्रत्यक्षदर्शीने मयंक अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

लाल किल्ल्याच्या शेजारी असलेल्या श्री दिगंबर जैन लाल मंदिरात त्या वेळी एक छोटासा लग्नसोहळा सुरू होता.मंदिरातील उपस्थित मयंक अग्रवाल म्हणाले, “आम्हाला मोठा आवाज आला. सुरुवातीला वाटले की सिलिंडरचा स्फोट झाला आहे. पण बाहेर आलो तेव्हा कारचे तुकडे आणि मांसाचे तुकडे सर्वत्र पसरलेले दिसले. दृश्य अतिशय भीषण होते.”मंदिराचे पर्यवेक्षक गिरीराज सिंह यांनी सांगितले, “मी बाहेर आलो तेव्हा सर्वत्र तुटलेल्या काचा, धूर आणि जळालेल्या गाड्या दिसत होत्या. लोक किंचाळत होते, सर्वजण जीव वाचवण्यासाठी पळत होते.”

स्फोटाचा क्षण

सोमवारी संध्याकाळी ६:५२ वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ बाहेर पांढऱ्या रंगाची हुंडई i20 कार उभी होती.क्षणातच ती कार स्फोटाने उडाली.या स्फोटात १२ हून अधिक वाहने जळून खाक झाली, तर अनेकांचा जागीच मृत्यू झाला.

 घटनेची टाइमलाइन

६:५२ वाजता: कारचा स्फोट – परिसरात अफरातफरी.

७:०० वाजता: लाल किल्ला परिसरात भीतीचे वातावरण, नागरिक पळत सुटले.

७:२९ वाजता: अग्निशमन दलाने ३७ मिनिटांत आग नियंत्रणात आणली.

९:२३ वाजता: विशेष कक्ष, एनआयए आणि एनएसजीच्या टीम घटनास्थळी दाखल.

९:२८ वाजता: गृहमंत्री अमित शहा यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

९:४२ वाजता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करून जखमींच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या.

१०:३५ वाजता: अमित शहा यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली.

 गुन्हा दाखल व तपास सुरू

उत्तर दिल्लीतील कोतवाली पोलिस ठाण्यात

UAPA आणि स्फोटक कायद्याच्या कलम १६, १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफएसएल, एनएसजी आणि एनआयएच्या टीमनी घटनास्थळाची पाहणी सुरू केली असून स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

 देशभरातून शोक

या घटनेनंतर देशभरातून दु:ख व्यक्त केले जात आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्फोटग्रस्तांना श्रद्धांजली वाहत म्हटले, “दिल्लीतील स्फोटाची घटना हृदयद्रावक आहे. या दु:खाच्या प्रसंगी सर्व पीडित परिवारांसोबत आमची संवेदना आहे.”इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या लाल किल्ल्याजवळील हा स्फोट केवळ राजधानीच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवून गेला आहे.


 Give Feedback



 जाहिराती