पुणे : 'भ्रातृ मंडळ,पुणे 'या संस्थेतर्फे लेवा पाटीदार समाजातील वधू वर मेळाव्याचे आयोजन, रविवार, दि.१६ नोव्हेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच,स्वारगेट येथे सकाळी ९ ते ५ या वेळेत केले आहे.या मेळाव्यासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश संजय पाटील हे प्रमुख पाहुणे,महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा डॉ. सुहास वारके आणि महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अनिल बोंडे व मेळावा प्रमुख चंद्रकांत नेमाडे यांनी दिली.या कार्यक्रमात बाराशे वर व आठशे वधू यांची संपूर्ण माहिती असलेल्या २ निर्देशिकांचे प्रकाशन केले जाणार आहे.मेळाव्यासाठी पुण्यासह, महाराष्ट्र व भारतातून समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.