पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पुणे महानगरपालिकेच्या 165 जागांसाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडामंच येथे ही सोडत पार पडली.या निवडणुकीत 165 नगरसेवक निवडले जाणार असून, यातील 83 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आरक्षणावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर असा कालावधी दिला आहे..
महापालिकेच्या 165 जागांसाठी अनुसूचित जातीसाठी 22 जागा, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 44 जागा, सर्वसाधारण 97 जागा आरक्षित केल्या होता. त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी 11 जागा, अनुसूचित जाती सर्वसाधारण 11 जागा, अनुसूचित जमाती महिला 1 जागा, अनुसूचित जमाती सर्वधारण 1 जागा, नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी 22 जागा, नागरिकांचा मागासवर्ग सर्वसाधारण 22 जागा, सर्वसाधारण महिलांसाठी 49 जागा, सर्वसाधारण 48 जागा चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रारूप आरक्षण सोडत 17 तारखेच्या आधी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पुणे महापालिका सोडतीची तयारी पूर्ण करण्यात आली असून त्याची रंगीत तालीम आज सोमवारी 10 नोव्हेंबरला घेण्यात आली होती. त्यानंतर लगेचच 17 नोव्हेंबरला आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केलं जाणार असून त्यावरील हरकती सूचना सादर करण्यास आठवडाभराचा कालावधी देण्यात आला आहे. सोडतीनंतर खऱ्या अर्थाने पुण्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे.अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध झाली असून आता आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महापालिकेच्या 41 प्रभागांतून 165 नगरसेवक निवडून येणार आहेत. यातील 40 प्रभाग 4 सदस्यीय असून प्रभाग 38 हा 5 सदस्यांचा आहे. या प्रभागांसाठी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिलांसाठीचे आरक्षित प्रभाग झाले आहेत.
प्रभाग निहाय हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी हा 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरच्या दुपारी 3 पर्यंत राहणार आहे. महापालिका येथील निवडणूक कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयात हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहे. ईमेल आणि गठ्ठ्याद्वारे हरकती आणि सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत. पुण्यातील गणेश कला क्रीडामंच येथे आज 11 वाजता महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
२०११ सालच्या जनगणनेनुसार पुणे महापालिकेची लोकसंख्या ही ३४,८१,३५९ एवढी असून यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ही ४,६८,६३३ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही ४०.६८७ एवढी आहे. पुणे महानगरपालिकेसाठी एकूण ४१ प्रभाग असून त्यामध्ये १६५ इतकी सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या एकूण ४१ प्रभागापैकी ४० प्रभाग हे चार सदस्यीय असून एक प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे.
पुणे महापालिका आरक्षण सोडत प्रभाग निहाय यादी
प्र.क्र. १ कळस-धानोरी – लोहगाव उर्वरित
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. अनुसूचित जमाती (ST)
क. महिला ओबीसी
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. २ फुलेनगर – नागपूर चाळ
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ३ विमाननगर – लोहगाव
अ. ओबीसी महिला
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ४ खराडी – वाघोली
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ५ कल्याणीनगर – वडगावशेरी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ६ येरवडा- गांधीनगर
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ७ गोखलेनगर – वाकडेवाडी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ८ औंध -बोपोडी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ९ सुस -बाणेर – पाषाण
अ. महिला अनुसूचित जमाती (ST)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १० बावधन – भुसारी कॉलनी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. ११ रामबाग कॉलनी – शिवतिर्थनगर
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १२ छ. शिवाजीनगर – मॉडेल कॉलनी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १३ पुणे स्टेशन – जय जवान नगर
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १४ कोरेगाव पार्क – घोरपडी – मुंढवा
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १५ मांजरी बु. – केशवनगर – साडेसतरा नळी
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १६ हडपसर – सातववाडी
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १७ रामटेकडी – माळवाडी – वैदुवाडी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १८ वानवडी – साळुंखे विहार
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. १९ कोंढवा खुर्द – कौसरबाग
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. २० शंकर महाराज मठ – बिबवेवाडी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. २१ मुकंदनगर – सॅलसबरी पार्क
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. २२ काशेवाडी – डालस प्लॉट
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र.क्र. २३ रविवार पेठ – नाना पेठ
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. २४ कसबा गणपती – कमला नेहरु हॉस्पिटल- के.ई.एम हॉस्पिटल
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. २५ शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई
अ. ओबीसी महिला
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. २६ घोरपडे पेठ – गुरुवार पेठ – समता भूमी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. २७ नवी पेठ – पर्वती
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. २८ जनता वसाहत – हिंगणे खुर्द
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. २९ डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३० कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३१ मयूर कॉलनी – कोथरुड
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३२ वारजे – पॉप्युलर नगर
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३३ शिवणे – खडकवासला – धायरी (पार्ट)
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३४ नऱ्हे – वडगाव बुद्रुक – धायरी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३५ सनसिटी – माणिक बाग
अ. महिला ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३६ सहकारनगर – पद्मावती
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३७ धनकवडी – कात्रज डेअरी
अ. ओबीसी
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३८ बालाजीनगर – आंबेगाव – कात्रज
अ. ओबीसी महिला
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण महिला
इ. सर्वसाधारण
प्र. क्र. ३९ अप्पर सुपर इंदिरानगर
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ४० कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी
अ. अनुसूचित जाती (SC)
ब. महिला ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
प्र. क्र. ४१ महंमदवाडी – उंड्री
अ. महिला अनुसूचित जाती (SC)
ब. ओबीसी
क. सर्वसाधारण महिला
ड. सर्वसाधारण
🔸 आरक्षणाचा तपशील
अनुसूचित जाती (SC): 22 जागा
महिला: 11
सर्वसाधारण: 11
अनुसूचित जमाती (ST): 2 जागा
महिला: 1
सर्वसाधारण: 1
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): 44 जागा
महिला: 22
सर्वसाधारण: 22
सर्वसाधारण प्रवर्ग: 97 जागा
महिला: 49
सर्वसाधारण: 48
प्रभागरचना एक नजरात
पुणे महापालिकेचे 41 प्रभाग असून, यामधून 165 नगरसेवक निवडले जाणार आहेत.
40 प्रभाग चार सदस्यीय
1 प्रभाग (क्र. 38) पाच सदस्यीय
आरक्षण निहाय प्रभागांचे काही उदाहरणे
प्र.क्र. 1 कळस-धानोरी – लोहगाव उर्वरित : महिला SC, ST, महिला OBC, सर्वसाधारण
प्र.क्र. 9 सुस - बाणेर – पाषाण : महिला ST, OBC, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण
प्र.क्र. 28 जनता वसाहत – हिंगणे खुर्द : महिला SC, OBC महिला, सर्वसाधारण
प्र.क्र. 33 शिवणे – खडकवासला – धायरी (पार्ट) : महिला OBC, सर्वसाधारण
प्र.क्र. 38 बालाजीनगर – आंबेगाव – कात्रज : OBC महिला, OBC, सर्वसाधारण महिला (2), सर्वसाधारण
महत्त्वाच्या तारखा
प्रारूप आरक्षण प्रसिद्ध : 17 नोव्हेंबर 2025
हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत : 17 ते 24 नोव्हेंबर, दुपारी 3 वाजेपर्यंत
ठिकाण : पुणे महापालिका निवडणूक कार्यालय व क्षेत्रीय कार्यालये
सूचना ईमेल किंवा गठ्ठ्याद्वारे स्वीकारल्या जाणार नाहीत
पार्श्वभूमी
२०११ च्या जनगणनेनुसार पुणे महापालिकेची लोकसंख्या ३४.८१ लाख आहे.
अनुसूचित जाती : ४.६८ लाख
अनुसूचित जमाती : ४० हजार
निष्कर्ष
आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे पुण्यातील राजकीय समीकरणात हालचाल सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला कोणत्या प्रभागात वाढ मिळेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.