सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार...', दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा
  • एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा
  • दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
  • बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर हेमा मालिनींचा संताप; म्हणाल्या – “हे अत्यंत बेजबाबदार आहे!”
  • दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर पुण्यात हाय अलर्ट; रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात बंदोबस्तात वाढ
  • दिल्ली बॉम्बस्फोटानंतर राज्यभरात अलर्ट, मुंबई पुण्यासह नागपुरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
 जिल्हा

राष्ट्रीय आदिवासी चित्रप्रदर्शन ‘आदी चित्र’चे मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या हस्ते उद्घाटन

डिजिटल पुणे    11-11-2025 15:47:17

मुंबई : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव वर्ष निमित्ताने केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालय आणि ट्रायफेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आदी चित्र’ राष्ट्रीय आदिवासी चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते झाले.यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाच्या संचालक दीपाली मसीरकर, प्रादेशिक व्यवस्थापक, ट्रायफेड डॉ. तारुल भावसार उपस्थित होते. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनात देशभरातील १०० हून अधिक पारंपरिक आदिवासी चित्रांचा समावेश असून, वारली (महाराष्ट्र), सौर व पट्टचित्र (ओडिशा), गोंड व भील (मध्य प्रदेश) आणि पिठोरा (गुजरात) या प्रमुख चित्रशैलींचे दर्शन घडविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे सहा आदिवासी कलाकारांकडून थेट वारली चित्रांकनाचे प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. हे प्रदर्शन दि. 10 ते 16 नोव्हेंबर 2025 दरम्यान दररोज सकाळी 11 ते सायं. 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.भारताच्या समृद्ध, विविध आणि रंगीबेरंगी आदिवासी कला-संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती