सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार...', दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा
  • एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा
  • दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
  • बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर हेमा मालिनींचा संताप; म्हणाल्या – “हे अत्यंत बेजबाबदार आहे!”
  • दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर पुण्यात हाय अलर्ट; रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात बंदोबस्तात वाढ
  • दिल्ली बॉम्बस्फोटानंतर राज्यभरात अलर्ट, मुंबई पुण्यासह नागपुरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
 जिल्हा

आदिवासी समाजाचा इतिहास व संस्कृतीच्या जतनासाठी संशोधनाची गरज – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

डिजिटल पुणे    11-11-2025 15:53:35

मुंबई : आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सखोल संशोधन आणि अध्ययनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.मुंबई विद्यापीठातील आदिवासी अध्ययन व संशोधन उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘आदिवासी अस्मिता’ आणि त्यांचे ‘सांस्कृतिक महत्त्व’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष हर्ष चौहान, प्रा. शामराव कोरेटी, अतुल जोग उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, या संशोधन केंद्राच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैविध्य यावर सखोल अभ्यास करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना आदिवासी समाजाच्या इतिहास, संस्कृती आणि अस्मितेचा अभ्यास करण्यासाठी नव्या संधी उपलब्ध होतील. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सन २०२४-२५ हे वर्ष “जनजाती गौरव वर्ष” साजरे करण्यात येत आहे. भगवान बिरसा मुंडा यांचे आदिवासी समाजासाठी जल, जमीन आणि जंगलाच्या हक्कांसाठी दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. त्यांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना भगवान बिरसा मुंडा आणि इतर आदिवासी क्रांतिकारकांच्या कार्याचा परिचय करून देण्यासाठी माहितीपर पुस्तिका वितरित करण्यात येणार आहेत. 

निसर्गपूजक आदिवासी समाजाने आपल्या श्रद्धा, संस्कृती आणि जीवनमूल्यांच्या माध्यमातून पर्यावरणाशी सुसंवाद साधत जीवन जगण्याची अद्वितीय परंपरा निर्माण केली आहे. या परंपरेचे संवर्धन आणि प्रसारासाठी शास्त्रशुद्ध संशोधनाची आवश्यकता असल्याचेही आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी यावेळी सांगितले.यावेळी प्रा. रवींद्र कुलकर्णी, हर्ष चव्हाण, अतुल जोग यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रकाश मसराम यांनी केले तर आभार डॉ. विनोद कुमारे यांनी मानले.


 Give Feedback



 जाहिराती