सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार...', दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा
  • एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा
  • दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
  • बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर हेमा मालिनींचा संताप; म्हणाल्या – “हे अत्यंत बेजबाबदार आहे!”
  • दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर पुण्यात हाय अलर्ट; रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात बंदोबस्तात वाढ
  • दिल्ली बॉम्बस्फोटानंतर राज्यभरात अलर्ट, मुंबई पुण्यासह नागपुरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
 विश्लेषण

'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार...', दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा दोषींवर कठोर कारवाईचे दिले आदेश

डिजिटल पुणे    11-11-2025 16:27:16

भूतान : देशाची राजधानी दिल्ली काल झालेल्या स्फोटाने हादरून गेली आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये सोमवारी सायंकाळी सुमारे 6.52 वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर राजधानीतील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. दिल्ली पोलिस, स्पेशल सेल आणि एनएसजीच्या टीम्स अलर्ट मोडवर आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवस भूतानच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्फोटाबाबत भाष्य केलं. या षडयंत्रामागे जे कोणी आहेत, त्यांच्याविरोधात कठोर पावलं उचलली जातील,षडयंत्र रचणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, आमच्या एजन्सी या घटनेच्या मुळाशी जातील आणि जे कोणी यामध्ये सहभागी आहेत, त्यांना धडा शिकवला जाईल असं पंतप्रधान  भूतानमध्ये म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, “या स्फोटामागील षड्यंत्रकार्‍यांना सोडलं जाणार नाही. सर्व दोषींना न्यायाच्या कठघऱ्यात उभं केलं जाईल.” मोदी पुढे म्हणाले, “मी आज येथे अत्यंत दुःखी मनाने आलो आहे. काल सायंकाळी दिल्लीमध्ये झालेल्या भयावह घटनेने सर्वांनाच हादरवले आहे. मी पीडित कुटुंबियांच्या वेदना समजू शकतो. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. मी काल रात्रीपासून तपास यंत्रणांशी सतत संपर्कात आहे. या कटामागे असलेल्या प्रत्येकाचा शोध घेतला जाईल आणि कोणालाही वाचू दिलं जाणार नाही.”ज्या कुटुंबांनी या घटनेत आपले प्रियजन गमावले आहेत, त्या प्रत्येक कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे.” त्यांनी शोकाकुल परिवारांना धीर दिला आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. यासोबतच, पंतप्रधानांनी सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांना त्वरित आणि निष्पक्ष तपास करून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या भूमीवरून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. भूतान येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की, “आमच्या तपास यंत्रणा या षडयंत्राच्या मुळाशी जातील. ‘या षडयंत्रामागे असलेल्या सूत्रधारांना सोडले जाणार नाही,’ असा थेट इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे.पुढे ते म्हणाले की, “मी अत्यंत दुःखी मनाने भूतानमध्ये आलो आहे. १० नोव्हेंबरच्या संध्याकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. काल रात्रीपासून स्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांकडून सातत्याने माहिती घेत असून या स्फोटामागच्या खऱ्या सुत्रधाराला तपास यंत्रणा शोधून काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“दिल्लीतील स्फोटाची घटना अत्यंत व्यथित करणारी असून, संपूर्ण देश स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या पीडित कुटुंबियांसोबत उभा आहे. अशा गहिवरलेल्या शब्दांत पीएम मोदी यांनी शोक व्यक्त करत शोकाकुल परिवारांना धीर दिला आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली.


 Give Feedback



 जाहिराती