सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'षडयंत्र रचणाऱ्यांना सोडले जाणार नाही; घटनेच्या मुळाशी जाणार...', दिल्लीतील स्फोटांवर भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा
  • एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस, म्हणाले, लवकर बरे व्हा
  • दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
  • बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर हेमा मालिनींचा संताप; म्हणाल्या – “हे अत्यंत बेजबाबदार आहे!”
  • दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर पुण्यात हाय अलर्ट; रेल्वे स्टेशन, बसस्थानक परिसरात बंदोबस्तात वाढ
  • दिल्ली बॉम्बस्फोटानंतर राज्यभरात अलर्ट, मुंबई पुण्यासह नागपुरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
 विश्लेषण

स्फोट झालेल्या गाडीत पोलिसांना सापडला पाय; पण कोणाचा? DNA रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

डिजिटल पुणे    13-11-2025 10:15:24

दिल्ली : दिल्लीत सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता. या स्फोटात नऊ नागरिकांचा मृत्यू झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, काही मृतांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले होते. हे तुकडे काही अंतरापर्यंत फेकले गेले होते. फॉरेन्सिक पथकांनी हे सगळे अवयव गोळा करुन मृतांची ओळख पटवली. ज्या कारमध्ये स्फोटकं होती, त्या कारची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा पोलिसांना या कारमध्ये ड्रायव्हिंग व्हिल अन् अ‍ॅक्सलेटर याच्यामध्ये फक्त एक पाय सापडला होता. या व्यक्तीचे उर्वरित शरीराच्या स्फोटामुळे चिंधड्या झाल्या होत्या. हा पाय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला होता. याठिकाणी डीएनए चाचणी  केल्यानंतर हा पायाचा भाग डॉ. उमर उन नबी याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्लीत झालेल्या कार स्फोटात दहशतवादी डॉ. उमरचा मृत्यू झाला. या आत्मघातकी हल्ल्यात त्याने स्वतःला उडवून घेतले. डीएनए नमुन्यांवरून त्याची ओळख पटली आहे. फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांचे हँडलर तुर्कीमध्ये असल्याचे समोर आले आहे. सूत्रांनुसार, हँडलरचे नाव UKasa असून तो जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असू शकतो. मार्च 2022 मध्ये काही भारतीय नागरिक तुर्कीला गेले होते, जिथे त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले असावे असा संशय आहे.

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला. या स्फोटात नऊ नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. स्फोट इतका शक्तिशाली होता की काही मृतांच्या शरीराचे तुकडे अक्षरशः हवेत उडाले आणि काही अंतरावर जाऊन पडले.

फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळावरून मानवी अवयव गोळा करून मृतांची ओळख पटवण्याचे काम हाती घेतले. तपासादरम्यान पोलिसांना स्फोट झालेल्या कारमध्ये केवळ एकच पाय सापडला. ड्रायव्हिंग व्हील आणि अॅक्सेलरेटरच्या मध्ये अडकलेला हा पाय पाहून पोलिसही चकित झाले.डीएनए तपासणीनंतर हा पाय डॉ. उमर उन नबी या दहशतवाद्याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 DNA रिपोर्टमधून उघड झालं सत्य

फॉरेन्सिक तपासणीतून समोर आले की, स्फोटाच्या वेळी कारमधील व्यक्ती म्हणजेच डॉ. उमर उन नबी स्वतः होता. हा आत्मघातकी हल्ला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.डॉ. उमर हा काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी होता. तो फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा सदस्य होता. तपास यंत्रणांनी या मॉड्यूलमधील काही साथीदारांना यापूर्वीच अटक केली होती.

 तुर्की कनेक्शन उघड

या संपूर्ण प्रकरणाचा धागा तुर्कीपर्यंत पोहोचला आहे. सूत्रांनुसार, उमरचा हँडलर “यूकासा (UKasa)” हा तुर्कीमध्ये असल्याची माहिती मिळाली असून, तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची शक्यता आहे.मार्च 2022 मध्ये काही भारतीय नागरिक तुर्कीला गेले होते, जिथे त्यांचे ब्रेनवॉशिंग केल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे.

 स्फोटापूर्वीची हालचाल

सीसीटीव्ही फुटेजनुसार, स्फोटासाठी वापरण्यात आलेली i20 कार दुपारी 3:18 वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमध्ये दाखल झाली होती. संध्याकाळी 6:23 वाजता ती कार पार्किंगमधून बाहेर पडली आणि 6:52 वाजता स्फोट झाला.अंदाजानुसार, उमरचा उद्देश मध्य दिल्लीमध्ये मोठा स्फोट घडवण्याचा होता. मात्र, तांत्रिक कारणांमुळे स्फोटकं आधीच ट्रिगर झाली आणि स्फोट लाल किल्ला परिसरातच झाला.

 कुटुंबीयांचा दावा

उमरच्या कुटुंबीयांनी मात्र या सर्व प्रकरणाबाबत अनभिज्ञतेचा दावा केला आहे.“आमची कार आमच्या घराबाहेर उभी आहे. स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार आमची नाही,” असे उमरच्या वडिलांनी सांगितले.लाल किल्ला परिसरातील या भीषण स्फोटानंतर दिल्ली पोलिस व राष्ट्रीय तपास यंत्रणा पूर्ण तपासात गुंतल्या आहेत. डीएनए तपासणीतून उमरचा मृत्यू निश्चित झाला असला तरी, या प्रकरणामागील आंतरराष्ट्रीय दहशतवादी संबंधांमुळे तपास आणखी गंभीर व गुंतागुंतीचा बनला आहे.


 Give Feedback



 जाहिराती