अहमदनगर : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पण यावेळी कारण दुर्दैवी आहे. त्यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला, मात्र या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच महाराजांवर सोशल मीडियातून वैयक्तिक टीका सुरू झाली. या ट्रोलिंगमुळे महाराजांनी प्रचंड मानसिक त्रास झाल्याचं सांगत कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
इंदुरीकर महाराज काय म्हणाले?
एका कीर्तनादरम्यान आपली वेदना व्यक्त करताना ते म्हणाले की,"आम्ही किती कष्ट केली लोक याचा विचार करत नाहीत, आम्ही आमचा संसार किती कष्टातून मोठा केला याचा विचार लोक करत नाहीत, आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती. आणि आता लोक इतके खाली गेलेत, की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसेत, यावरुन लोकांचे कमेंट्स आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल? आता चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या, पण तिच्या बापाला...मला तुम्ही घोडे लावा.. माझा पिंड गेलाय... माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे. पण या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करुन टाकलंय. काय... मला एक सांगा.. मुलगी तुम्हालाही आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली, तर तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील की म्या घेतले असतील? एवढी तरी क्लिप टाकणाऱ्यांना लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावा पण किती?".
माझ्या मुलीच्या कपड्यांवरून बातम्या बनवल्या जात आहेत.
माझ्या मुलीचा काय दोष? मला तुम्ही घोडे लावा, पण माझ्या लेकरांना तरी सोडा.”ते पुढे म्हणाले की ,“मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील की म्या घेतले असतील? एवढी तरी लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावा पण किती?”“३१ वर्षे लोकांसाठी जगलो, पण आता मन कंटाळलमहाराजांनी पुढे भावनिक होत सांगितले की,मी ३१ वर्ष लोकांसाठी चांगलं केलं, पण फळ काय मिळालं?माझ्यापर्यंत टीका चालली असती, पण आता माझ्या घरापर्यंत आली.आता मी थांबतोय, दोन-तीन दिवसात एक क्लिप टाकतो आणि निर्णय जाहीर करतो.मजा राहिली नाही आता.”
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा
महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा साहिल चिलाप यांच्यासोबत संगमनेर येथे पार पडला.हा कार्यक्रम राजेशाही थाटात झाला रथावरून मिरवणूक, वारकरी वेशातील टाळकरी, पाहुण्यांची उपस्थिती, आणि उत्साही वातावरण यामुळे हा सोहळा चर्चेचा विषय ठरला.तथापि, विशेष म्हणजे या कार्यक्रमात सत्कार, हार, तुरे आणि शाल-श्रीफळ नाकारून साखरपुडा साधेपणाने पार पडला.
जावई कोण आहेत?
माहितीनुसार, साहिल चिलाप हे मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून, उच्च शिक्षित आहेत. गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे आणि शहरात त्यांनी स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे.इंदुरीकर महाराजांच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावर चाहत्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे. महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षणही लोकांना प्रेरणा देणारे ठरत आहेत.
निष्कर्ष
इंदुरीकर महाराज हे नेहमी विनोदी शैलीत समाजप्रबोधन करणारे किर्तनकार म्हणून ओळखले जातात. मात्र या घटनेने ते मानसिकदृष्ट्या खचले असून, त्यांनी कीर्तन थांबवण्याचा विचार केल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.सोशल मीडियावरून होत असलेली वैयक्तिक टीका केवळ व्यक्ती नव्हे तर कुटुंबालाही किती त्रासदायक ठरू शकते, हे या घटनेतून प्रकर्षाने दिसून येते.