सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा
  • मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
 DIGITAL PUNE NEWS

छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना ; भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश टेमकर यांचा संशयास्पद मृत्यू; गंगापूर तालुक्यात खळबळ

डिजिटल पुणे    15-11-2025 11:03:06

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील ही घटना आहे. या मृत्यूमागचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह शुक्रवारी (दि. 14) दुपारी गंगापूर तालुक्यातील हदियाबाद-नारवाडी रस्त्यालगत, नारवाडी शिवारातील नळकांडी पुलाजवळ आढळला. यामुळे संपूर्ण गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. गणेश टेमकर (वय 30) यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या नरवाडी शिवारात काल एक संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. तो मृतदेह भालगाव येथील रहिवासी असलेले भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे

स्थानिक सरपंच आसिफ पटेल आणि समाजसेवक गौरव विधाटे यांनी मृतदेह आढळल्यानंतर गंगापूर पोलिसांना तत्काळ माहिती दिली. पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड, विजय पाखरे, अनिरुद्ध शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे पाठवण्यात आला.

मृतदेहावर मारहाणीचे कोणतेही ठसे नाहीत

प्राथमिक तपासात मृतदेहावर मारहाण, शस्त्राचा हल्ला किंवा वाहनाची धडक अशी कोणतीही स्पष्ट चिन्हे आढळली नाहीत. त्यामुळे हा अपघात, नैसर्गिक मृत्यू की घातपात याबाबत पोलिसांनी अद्याप कोणताही निष्कर्ष काढलेला नाही.

स्थानिकांनी दिली पोलिसांना माहिती

मृतदेह दिसताच स्थानिक सरपंच आसिफ पटेल आणि समाजसेवक गौरव विधाटे यांनी गंगापूर पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे पाठवण्यात आला आहे.

गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासाअंती शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.

गणेश टेमकर यांची पार्श्वभूमी

गणेश रघुनाथ टेमकर हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू भाजपच्या स्थानिक वर्तुळात धक्का देणारा आहे, आणि त्यांचे निधन झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ते भालगाव येथील रहिवासी होते आणि त्यांच्या अचानक मृत्यूने स्थानिक स्तरावर एक मोठा गोंधळ उडवला आहे.


 Give Feedback



 जाहिराती