उरण : उरण पोलिस प्रशासन विभागाने व्यसनमुक्त आणि सुरक्षित समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला आहे – “नशा मुक्त उरण अभियान.” या मोहिमेचा उद्देश व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे, मदत उपलब्ध करून देणे आणि अल्कोहोल व ड्रग्जच्या व्यसनात अडकलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करणे हा आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (A.A.) आणि नार्कोटिक्स अॅनॉनिमस (N.A.) यांच्या मोफत मदतीसाठी सूचना व मार्गदर्शन फलक उरण परिसरातील प्रमुख ठिकाणी बसविण्यात आले आहेत. या सामाजिक कार्यासाठी आवश्यक परवानग्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि सतत सहकार्याबद्दल आम्ही सीनियर पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या साहाय्यामुळे उरणमधील नागरिकांसाठी ही महत्त्वाची सेवा सहज उपलब्ध झाली आहे.असे आभार आशीर्वाद ग्रुपतर्फे मानण्यात आले.
अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (A.A.) बद्दल
अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस ही जगभरातील एक आत्मीयता-आधारित संस्था आहे, जिथे मद्यपानाच्या व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन एकमेकांना आधार देतात. A.A. १२-स्टेप कार्यक्रमाद्वारे व्यक्तीला संयम प्राप्त करण्यास आणि टिकविण्यास मदत करते.
A.A. आशिर्वाद ग्रुप मीटिंग पत्ता:ग्राऊंड फ्लोअर, सेंट मेरीज स्कूल, राजपाल नाका, उरण शहर मीटिंग दिवस: दर बुधवार आणि रविवारवेळ: सायं. 7:00 ते 8:30A.A. (दारू व्यसन उरण): 9167240004 / 9930958374
नार्कोटिक्स अॅनॉनिमस (N.A.) बद्दल:-
नार्कोटिक्स अॅनॉनिमस ही ड्रग्जच्या व्यसनात अडकलेल्या व्यक्तींना मदत करणारी जागतिक संस्था आहे. N.A. १२-स्टेप कार्यक्रमाद्वारे सदस्यांना सुरक्षित वातावरणात अनुभव शेअर करण्याची आणि पुनर्वसनाच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी देते.
N.A. (ड्रग्ज व्यसन) हेल्पलाइन : 7045379493
“नशा मुक्त उरण अभियान” अधिक प्रभावी करण्यासाठी उरण पोलिस विभाग सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि व्यसनमुक्तीबाबत जागृती पसरवावी. सामूहिक प्रयत्नांद्वारे आपण उरणला अधिक निरोगी आणि व्यसनमुक्त बनवू शकतो.असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.