सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी ! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; ICT कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
  • महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, चाकणमध्ये ठाकरे-शिंदेंची शिवसेना एकत्र
  • ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
  • दुर्धर आजारानंतरही संजय राऊतांमधील शिवसैनिक जागा झाला, मास्क लावून घराबाहेर पडले, स्मृतीस्थळ गाठून बाळासाहेबांना वंदन!
  • निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा
  • मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
 शहर

वेळेवर मिळकतकर भरणाऱ्या पुणेकरांना २२% सूट देण्याची मागणी;प्रामाणिक करदात्यांसाठी विशेष सवलतीची मागणी

डिजिटल पुणे    17-11-2025 11:07:34

पुणे – पुणे महानगरपालिकेकडून दरवर्षी कर बुडवणाऱ्या नागरिकांसाठी ‘अभय योजना’ जाहीर केली जाते. या योजनेत करबुडव्या नागरिकांना तब्बल ७५ टक्क्यांपर्यंत दंडमाफी दिली जात आहे. मात्र दुसरीकडे, दरवर्षी प्रामाणिकपणे व वेळेवर मिळकत कर भरणाऱ्या नागरिकांना केवळ २ टक्क्यांचीच सूट देण्यात येते, याबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.

आम्ही एक मागणी करीत आहोत. जे सातत्याने वेळेवर प्रामाणिकपणे कर वेळेत मिळकत कर भरून मनपाच्या तिजोरीत दरवर्षी वेळेत भर टाकत आहेत. त्याबद्दल त्यांना मिळकतकरात आणखी २० % सूट देण्यात यावी. म्हणजे त्यांना एकूण २२% सूट मिळेल.

  आयुक्त साहेब आपण महानगरपालिकेत नागरिकांच्या भल्याचे काम करत आहात. कर आकारणी कर संकलन प्रमुख आपल्या कामामधे खोडा घालण्याचे काम करीत आहेत. कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख यांनी आदेश देऊन कर बुडवणार्यांचे अधिकार्यांनी गुलाब पुष्प देउन स्वागत करा असा जो फतवा काढला तो पुण्यातील वेळेवर कर भरणार्या नागरिकांचा अपमान करणारा आहे. सदरचा आदेश आपण रद्दबादल करावा. हि विनंती.

शहरातील नागरिकांच्या वतीने असा आरोप करण्यात आला आहे की “मनपा प्रशासन कर न भरणाऱ्यांसाठी पायघड्या घालत आहे; पण वेळेवर कर भरणाऱ्यांना योग्य न्याय दिला जात नाही.”याबाबत नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देत मागणी केली आहे की, वेळेवर मिळकतकर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांना आणखी २०% सूट देण्यात यावी, ज्यामुळे त्यांना एकूण २२% करसवलत मिळेल.तसेच कर आकारणी विभागाकडून करबुडव्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाला “वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांचा स्पष्ट अपमान” असे संबोधत संबंधित आदेश तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी हस्तक्षेप करून महाराष्ट्र मंत्रिमंडळात कायदा संमत करून पुणेकरांना २२% करसवलत द्यावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.पुणेकरांच्या कररूपी पैशातून शहरातील विकासकामे केली जात असताना, वेळेवर कर भरणाऱ्या नागरिकांना योग्य प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती