सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी ! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; ICT कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
  • महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, चाकणमध्ये ठाकरे-शिंदेंची शिवसेना एकत्र
  • ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
  • दुर्धर आजारानंतरही संजय राऊतांमधील शिवसैनिक जागा झाला, मास्क लावून घराबाहेर पडले, स्मृतीस्थळ गाठून बाळासाहेबांना वंदन!
  • निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा
  • मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
 जिल्हा

वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

डिजिटल पुणे    18-11-2025 10:47:07

मुंबई  : भारतीय वाळूशिल्पकलेला जागतिक स्तरावर नवी ओळख देणारे पद्मश्री सुदर्शन पटनायक आता प्रथमच त्यांच्या निवडक कलाकृतींसह मुंबईच्या प्रेक्षकांसमोर येत आहेत. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते संध्याकाळी ५ वाजता  होणार आहे. दि. १८ ते २३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सकाळी ११ ते सायं. ७ या वेळेत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहणार आहे.

१५ एप्रिल १९७७ रोजी जन्मलेल्या सुदर्शन पटनायक यांच्या कलायात्रेची सुरुवात जलरंगांच्या प्रयोगांपासून झाली; परंतु पुरीच्या वाळूने त्यांच्या सर्जनशीलतेला अद्वितीय दिशा दिली. साध्या धान्यांच्या कणांतून अर्थपूर्ण, प्रभावी आणि भावस्पर्शी निर्मिती घडवण्याची ताकद त्यांच्या हातात होती आणि हीच ताकद पुढे संपूर्ण जगाने अनुभवली. पुरीच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर बालपणी एका कलाकाराच्या मनात उगवलेली सर्जनाची ठिणगी आज जागतिक किर्तीची ज्योत बनली आहे.

गेल्या ३५ वर्षांत, त्यांनी ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि महोत्सवांत भारताचे प्रतिनिधित्व करत भारतीय वाळू शिल्पकलेला अभूतपूर्व प्रतिष्ठा मिळवून दिली. इटालियन सॅण्ड आर्ट अवॉर्ड (२००१), पद्मश्री (२०१४), सेंट पीटर्सबर्गचा गोल्डन सॅण्ड मास्टर अवॉर्ड (२०२४), फ्रेड डॅरिंग्टन सॅण्ड मास्टर अवॉर्ड (यू.के., २०२५) अशा अनेक जागतिक सन्मानांनी त्यांचा गौरव झाला आहे. विशेष म्हणजे, फ्रेड डॅरिंग्टन पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय कलाकार आहेत.पटनायक केवळ सर्जनशील कलाकार नाहीत; ते कलेद्वारे सामाजिक भान जागवणारे द्रष्टे आहेत. त्यांच्या शिल्पांमधून शांतता, करुणा, पर्यावरण-जाणीव आणि मानवतेचे सार्वत्रिक संदेश सातत्याने उमटतात.

सुदर्शन पटनायक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली गोल्डन सॅण्ड आर्ट इन्स्टिट्यूट नव्या पिढीतील कलाकारांना वाळू शिल्पकलेचे प्रशिक्षण देत आहे, ज्यामुळे या कलेचा वारसा आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक दृढ होत आहे. शिल्पकलेसोबतच नव्या युगातील दृश्य अभिव्यक्तीचा शोध घेत त्यांनी अलीकडेच मिश्र-माध्यमातील कलाकृती निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. वाळूच्या नाजूकतेला रंग, पोत आणि तांत्रिक स्थैर्याची सांगड घालणारी ही त्यांची नवीन शैली मुंबईतील कलाप्रेमींना अनुभवता येणार  आहे. या प्रदर्शनाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती