सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लिम नगरसेवक विजयी, नाशिक जिल्ह्यात खातं उघडलं
 शहर

'दस्तकारी हाट ' वस्त्र प्रदर्शन १९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान

डिजिटल पुणे    18-11-2025 11:20:33

पुणे : 'दस्तकारी हाट ' वस्त्र प्रदर्शन विंटर अँड वेडिंग एडिशन- २०२५ चे आयोजन १९ नोव्हेंबरपासून पुण्यातील कर्वे  रस्त्यावरील सोनल हॉल(आबासाहेब गरवारे कॉलेजजवळ) येथे होणार आहे. हे प्रदर्शन २५ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून दररोज सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत नागरिकांसाठी खुले  राहील.१२ राज्यातील ५५ वस्त्र दालने या प्रदर्शनात असतील.या वर्षीचे विशेष आकर्षण द सिल्क्स अँड हँडलूम्स ऑफ इंडिया कलेक्टिव असेल.

पारंपरिक भारतीय विणकाम, हस्तनिर्मित साड्या, विविध प्रादेशिक वस्त्रपरंपरा आणि हातमागावरील अप्रतिम निर्मिती यांचा सुंदर संग्रह या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. बनारसी ब्रोकेड, कलमकारी, ब्लॉक प्रिंट्स, रंगीबेरंगी सिल्क्स आणि अनेक राज्यांतील प्रसिद्ध हातमाग कापडांचे प्रदर्शन विणकर  आणि डिझायनर्सकडून होणार आहे.भारतीय हातमाग परंपरेचा प्रचार आणि प्रसार करताना नागरिकांना लग्न आणि उत्सवी हंगामासाठी उत्तम गुणवत्तेची वस्त्रे खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनातून मिळेल.प्रदर्शनासाठी प्रवेश तसेच पार्किंग विनामूल्य आहे.


 Give Feedback



 जाहिराती