सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लिम नगरसेवक विजयी, नाशिक जिल्ह्यात खातं उघडलं
 जिल्हा

घाटकोपर : शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा; तेलात कापूर पडल्याचे उघड

डिजिटल पुणे    18-11-2025 13:10:58

मुंबई : घाटकोपर परिसरातील शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने तब्बल 15 ते 16 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व विद्यार्थ्यांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर पश्चिमेमधील एका शाळेत काल सकाळच्या वेळेत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. विषबाधा झालेले हे विद्यार्थी इयत्ता पाचवी ते आठवतील असल्याची माहिती मिळत आहे. त्या दिवशी या विद्यार्थ्यांनी शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाला त्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या. हा प्रकार पाहिल्यानंतर घाबरलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तपासण्यासाठी महानगरपालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांना बोलावले तर काही पालकांनी आपल्या मुलांना खाजगी रुग्णालयात दाखल केले.

शाळेच्या मुख्याध्यापिकेने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी त्यांनाही समोसा खाताना कापराचा वास आला होता त्यानंतर त्यांनी कॅन्टीनमध्ये जाऊन कोणालाही समोसा देऊ नये असे सांगितले होते. मात्र ज्या वेळेस विद्यार्थ्यांना त्रास झाला तेव्हा समजले की,समोसा करताना कोणत्याही शिळ्या भाजीचा वापर झालेला नाही तर समोसा करताना जे तेल वापरले त्यामध्ये देवासमोर ठेवलेला कापूर त्या तेलात पडला होता. सध्या पाच विद्यार्थ्यांवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या पालकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.

मुंबईतील घाटकोपर (प.) परिसरातील एका शाळेतून धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या कॅन्टीनमध्ये तळण्यात आलेल्या समोशांमुळे तब्बल २० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. विद्यार्थ्यांनी समोसा खाल्ल्यानंतर काही मिनिटांतच पोटदुखी, मळमळ, उलट्या अशी लक्षणे दिसू लागली.प्राथमिक तपासात समोसा तळण्यासाठी वापरलेल्या तेलात चुकून कापूर पडल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी स्वतःलाही समोसा खाताना कापराचा वास आल्याचे सांगितले. त्यांनी त्वरित कॅन्टीनला समोसे वाटप थांबवण्याचे निर्देश दिले असले, तरी त्यापूर्वी काही विद्यार्थ्यांनी समोसा खाल्ल्याने त्यांची तब्येत बिघडली.

घटना लक्षात येताच शाळेत महानगरपालिकेच्या डॉक्टरांना बोलावण्यात आले. काही विद्यार्थ्यांना राजावाडी रुग्णालयात, तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असून काहींना डिस्चार्जही देण्यात आला आहे.शिक्षण निरीक्षक मुश्ताक शेख यांनी सांगितले की, तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.एन विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र हंगे यांनी शाळांना फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले.या घटनेनंतर पालकांनी शाळा प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्याध्यापिकेने सांगितले की, त्यांनाही समोसा खाताना कापराचा वास आल्याने त्यांनी तत्काळ समोसा देणे थांबवण्याचा आदेश दिला होता. मात्र, तोपर्यंत काही विद्यार्थ्यांनी तो खाल्ल्याने त्यांची प्रकृती बिघडली.राजावाडी रुग्णालयात पाच विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर डिस्चार्जही देण्यात आला आहे.तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.शाळांनी फूड सेफ्टी अँड स्टँडर्डच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे एन विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र हंगे यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती