सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लिम नगरसेवक विजयी, नाशिक जिल्ह्यात खातं उघडलं
 जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २०२५ उत्साहात पार

डिजिटल पुणे    18-11-2025 16:47:43

मुंबई  : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा युवा महोत्सव २०२५-२६ उत्साहात पार पडला. हा महोत्सव नुकताच चर्नी रोड येथील मारवाडी कमर्शिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे पार पडला.महोत्सवात १५० ते १६० युवक-युवतींनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रारंभी क्रीडा अधिकारी अनिल घुगे यांनी महोत्सवाचे प्रास्ताविक करताना युवकांना सहभागाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे ट्रस्टी देवीचंदजी व प्राचार्या कुसुम पाठक उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी युवकांना शुभेच्छा देत स्पर्धांमध्ये उत्कृष्टता साधण्याचे आवाहन केले.महोत्सवात सांस्कृतिक, विज्ञान, चित्रकला, कथा व कविता लेखन तसेच कौशल्य विकास व नवोपक्रम या विभागांतील स्पर्धा पार पडल्या. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र तज्ज्ञ परीक्षक मंडळ कार्यरत होते.

लोककला विभागासाठी ग्लोरिया डिसोझा, नंदकिशोर मसुरकर व डॉ. शिवाजी वाघमारे, विज्ञान विभागासाठी जी. एम. पाटील व सुनील भुसारा, चित्रकला विभागासाठी रूपेश शाह व राजेंद्र नवाले, तर कथा-कविता विभागासाठी श्रीमती नंदिनी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा गंभीर (सोमय्या कॉलेज) यांनी केले.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, क्रीडा कार्यकारी अधिकारी साहिल उतेकर, क्रीडा अधिकारी नेहा साप्ते व अनिल घुगे, क्रीडा मार्गदर्शक फुलचंद कराड, वरिष्ठ लिपिक रंगनाथ डुकरे, तसेच गुरुकुल ट्रस्टचे उमेश मोरकर आणि मारवाडी कमर्शिअल हायस्कूलचे मिश्रा सर यांचे विशेष सहकार्य लाभले. रांगोळी स्पर्धेसाठी सर्वदा टीमचे योगदान उल्लेखनीय ठरले.


 Give Feedback



 जाहिराती