पुणे : 'फोरम ऑफ ऑप्थल टीचर्स ऑफ इंडिया' चे ९ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन दि.१० व ११ जानेवारी २०२६ रोजी स्वस्ति प्लाझा भुवनेश्वर( ओडिशा )येथे आयोजित करण्यात आले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी (पुणे) चे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर यांची अधिवेशनाच्या उदघाटकपदी निवड करण्यात आली आहे. अधिवेशनाचे उद्घाटन ते अतिथी म्हणून करणार आहेत.डॉ. केळकर यांना त्यांच्या नेत्रविज्ञान,प्रशिक्षण क्षेत्रातील आदर्श व आजीवन समर्पित अध्यापन कारकिर्दीच्या गौरवार्थ उद्घाटन सत्रात उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.या अधिवेशनात फोरम तर्फे नेत्रविज्ञानातील अध्यापन व प्रशिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. नामनिर्देशन सर्वांसाठी खुले असून, पुरस्कारार्थींनी ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे.