सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
  • अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; अनगरमध्ये बाळराजेंकडून चॅलेंज, आता राजन पाटील यांनी माफी मागितली!
  • थंडीचा कडाका! पुण्यात विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, कोकणातील ‘महाबळेश्वर’ असणाऱ्या दापोलीत हाडं गोठवणारी थंडी, परभणीचे तापमान 7 अंशावर
  • ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला
 जिल्हा

मुंबईत बांधकाम व्यवसायिकावर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या; पोलीस, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी

डिजिटल पुणे    19-11-2025 17:06:26

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह पुणे, ठाणे या शहरात बिल्डर्स लॉबी वाढत असून बांधकाम क्षेत्रातील कोट्यवधिंची उलाढाल गुन्हेगारीला प्रवृत्त करताना दिसून येते. त्यातून, धमक्या, खून, अपहरणासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. आता, पुन्हा एकदा मुंबईत एका बांधकाम व्यवसायिकाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात गोळीबार भरदिवसा विकासकावर गोळीबार करण्यात आला. अज्ञाताकडून विकासकावर 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आले असून गोळीबारात विकासक गंभीर जखमी झाला आहे.

कांदिवली चारकोप परिसरात बंदर पाखाडी येथे पेट्रोल पंपासमोर अज्ञाताकडून फ्रेंडी दिलीमा भाई या विकासावर गोळीबार करण्यात आला. फ्रेंडीभाई हा तरुण बांधकाम विकास आहे, ते कारमध्ये बसले असताना दोघांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यावेळी, अज्ञातांनी दोन ते तीन राउंड फायर केले, त्यामध्ये दिलीमा भाईच्या पोटात दोन गोळ्या घुसल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

गोळीबारानंतर अज्ञात तरुण घटनास्थळावरून फरार झाले आहेत. जखमी तरुणाला बोरिवली येथील ऑस्कर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, गोळीबारच्या घटनेनंतर चारकोप पोलीस आणि डीसीपी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून वेगवेगळ्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा तपासून आरोपीचे शोध घेत आहेत. तर, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र, मुंबई शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात, लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोघ घेतला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती