सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मै सत्यनिष्ठा से... बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी, रचला नवा विक्रम; मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन
  • गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
  • अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; अनगरमध्ये बाळराजेंकडून चॅलेंज, आता राजन पाटील यांनी माफी मागितली!
  • थंडीचा कडाका! पुण्यात विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, कोकणातील ‘महाबळेश्वर’ असणाऱ्या दापोलीत हाडं गोठवणारी थंडी, परभणीचे तापमान 7 अंशावर
 राज्य

नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी मोहोळ–गडकरी बैठक; तातडीच्या विविध उपाययोजना करणार

डिजिटल पुणे    20-11-2025 13:15:26

नवी दिल्ली: पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात होणाऱ्या अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात, यासाठी काल (बुधवारी, ता १९) केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेत सविस्तर चर्चा केली. या परिसरातील होणारे अपघात थांबावेत, यासाठी नितीन गडकरींच्या मार्गदर्शनात याआधीही विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मात्र नव्याने होणारे अपघातही थांबवेत, याबाबत अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. त्यावर नितीन गडकरींनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत पावले उचलण्यासंदर्भात आश्वस्त केल्याचंही मोहोळ यांनी सांगितलं आहे.

मागील गुरुवारी नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघातानंतर महामार्ग प्राधिकरण, महापालिका प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. त्यात विविध उपाययोजना निश्चित करण्यात आल्या होत्या, याबाबत नितीन गडकरीशी संवाद साधला असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

भीषण अपघातानंतर तात्काळ बैठका आणि गडकरींची भेट

या दुःखद घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने संयुक्त बैठक घेण्यात आली होती, ज्यात अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना निश्चित करण्यात आल्या होत्या. या उपाययोजनांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी, खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली.

नितीन गडकरींच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वीही उपाययोजना झाल्या होत्या, तरीही नव्याने झालेले अपघात थांबवण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपायांवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी मोहोळ यांनी केली. गडकरी यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला त्वरित अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत.

गेल्या गुरुवारी झालेली दुर्घटना — काय घडले?

कात्रज बोगद्याजवळील तीव्र उतारावर उतरतानाच साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित कंटेनरने सलग अनेक वाहनांना धडक दिली. एका कारला जोरदार धडक देत तो कंटेनर पुढे सरकत राहिला आणि काही क्षणांतच दोन ट्रकांच्या मध्ये अडकलेली कार पेट घेऊन चेंदामेंदा झाली.या भीषण अपघातात दोन महिला, एक लहान बाळ आणि चार पुरुषांचा मृत्यू झाला. तसेच 20–22 जण जखमी झाले. वाहनांना वेगळे करण्यासाठी कटर आणि क्रेनचा वापर करावा लागला.

या अपघातात एका कारला ट्रकने जोरदार धडक दिली. ती कार ट्रकच्या समोरच्या भागात अडकली आणि सोबत फरफटत पुढे गेली. पुढे जाऊन याच ट्रकने दुसऱ्या एका ट्रकला धडक दिली. दोन ट्रकच्यामध्ये अडकलेल्या कारने क्षणार्धात पेट घेतला आणि आगीचा मोठा भडका उडाला. तीनही जळत असलेली वाहने काही अंतर पुढे जाऊन थांबली. अपघातातील दोन्ही ट्रक राजस्थान पासिंगचे असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पुण्यातील या भीषण अपघातात कारमधील पाच प्रवाशांसह कंटेनर चालक आणि सोबत असलेल्या क्लिनरचा देखील मृत्यू झाला. एकूण आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन महिला, एक लहान बाळाचा आणि चार पुरुषांचा समावेश आहे. याशिवाय 20 ते 22 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर परिसरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. वाहने एकमेकांमध्ये इतकी अडकली होती की, त्यांना बाजूला करण्यासाठी कटर आणि क्रेनचा वापर करावा लागला. 

अपघात रोखण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या उपाययोजना

1. जड वाहनांसाठी वेगमर्यादा कमी

– 60 किमी/तास ऐवजी आता 30 किमी/तास वेगमर्यादा लागू.

2. स्वतंत्र मार्गिकेचा विचार

– जड आणि हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन्स ठेवण्याबाबत प्रस्ताव.

3. जागेवरच दंडात्मक कारवाई

– वाहतूक नियम न पाळणाऱ्यांवर तत्काळ कारवाई.

या उपाययोजनांमुळे नवले पूल परिसरातील अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती