पुणे : नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना आणखी अशाच एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील संतापजनक घटना घडली आहे. शेजाऱ्यानेच घात करून एका 7 वर्षीय चिमुकलीच्या अब्रुचे अक्षरशः लचके तोडले आहे.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे सात वर्षांच्या मुलीवर शेजाऱ्याने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी देविदास रोहिदास गर्जे (रा. नेतवड, ता. जुन्नर) याला पोलिसांनी अटक केली आहे. तो ऊसतोड कामगार असल्याची माहिती मिळते.
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकली घराच्या अंगणात एकटी खेळत होती. आजुबाजुला कोणी नाही, याची संधी घेऊन नराधमाने पीडितेला आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.मुलगी घराच्या अंगणात खेळत असताना परिसर सुनसान असल्याची संधी आरोपीने साधली. त्याने तिला आपल्या घरात ओढत नेले आणि अत्याचार केला. वेदनेने थरथरणाऱ्या मुलीकडे आईने चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तत्काळ ओतूर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार नोंदवली.
नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेला पुणे येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास ओतूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक लहु थाटे हे करत आहेत.
तक्रार मिळताच पोलिसांनी कोणतीही विलंब न करता आरोपीला बेड्या ठोकल्या. पीडित मुलीला तातडीने पुण्यातील शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास ओतूर पोलिस स्टेशनचे प्रभारी, सहायक पोलिस निरीक्षक लहु थाटे करत आहेत.
दरम्यान, मालेगावची घटना ताजी असताना..त्या घटनेसाठी न्यायाची मागणी होत असतानाच जुन्नरमधून ही घटना समोर येते. आपण अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी जबाबदारी कधी घेणार? अशा गंभीर गुन्ह्यांसाठी पोलिसांची तत्परता कायम राखली जाईल का? मुलांवरचे अत्याचार पूर्णपणे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना काय? बाललैंगिक अत्याचारासाठीच्या शिक्षांचा कडकपणा प्रत्यक्षात गुन्हेगारांना घाबरवतोय का? या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत प्रक्रिया किती वेगाने, किती पारदर्शकपणे पार पडणार? असे अनेक प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्रासमोर निर्माण झाले आहेत.