सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई; घेतलेले पैसे वसूल होणार!
  • मनसेची साथ सोडा, मुंबईत आमच्यासोबत या; काँग्रेसची उद्धव ठाकरेंना ऑफर
  • दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; स्फोटानंतर धुराचे लोट, पायलटबाबत अद्याप अनिश्‍चितता
  • भाजपने कुटुंब कल्याण योजना राबवली, त्यांच्याच जागा बिनविरोध कशा होतात? रोहित पवारांचा हल्लाबोल
  • बांगलादेशात भूकंपात 6 जणांचा मृत्यू, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली, आयर्लंड-बांगलादेश क्रिकेट सामना थांबवला
 जिल्हा

उरण नगरपरिषद निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदासाठी 4, तर नगरसेवक पदाच्या 21 जागांसाठी तब्बल 48 उमेदवार रींगणात

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    22-11-2025 10:41:08

उरण : उरण नगरपरिषद निवडणुक संदर्भात दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण 4 उमेदवार, तर नगरसेवक पदाच्या 21 जागांसाठी तब्बल 48 उमेदवार अंतिम रिंगणात असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.पाच जणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर आता उरणमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट टक्कर रंगणार असून, शिवसेना शिंदे गट व अपक्ष उमेदवारांच्या प्रवेशामुळे अनेक प्रभागांत बहुकोनी लढती अधिक चुरशीच्या झाल्या आहेत.आता निवडणुक उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्याने प्रचारात अधिकच रंगत येणार आहे.

नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून कोळी शोभा भुवन, महाविकास आघाडीकडून घाणेकर भावना कुंदन, शिंदे गटाकडून रुपाली तुषार ठाकूर, तर अपक्ष म्हणून शेख नसरीन इसरार या चार उमेदवारांची नावे अंतिम आहेत. नगरपरिषद प्रमुख पदासाठीची ही चौकोनी लढत शहराच्या राजकीय समीकरणात नवे ताण आणणारी ठरणार आहे.

 नगरसेवक पदांच्या 21 जागांसाठीच्या सर्व प्रभागांची उमेदवार यादीही दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी निश्चित झाली आहे . प्रभाग 1 मध्ये रजनी कोळी, प्रीती कोळी, जविंद्र कोळी, राकेश कोळी; प्रभाग 2 मध्ये रिबेका मढवी, रसिका मेश्राम, नंदकुमार लांबे, विक्रम म्हात्रे व अंजली खंडागळे; प्रभाग 3 मध्ये नम्रता ठाकूर, वंदना पवार, सुरेश शेलार, अमित म्हात्रे, तुषार ठाकूर व शेख खालीक; प्रभाग 4 मध्ये संदीप पानसरे, अतुल ठाकूर, हंसराज चव्हाण, रोशनी थळी, प्रमिला पवार व रुपाली ठाकूर; प्रभाग 5 मध्ये धनश्री शिंदे, नाहिदा ठाकूर, जसिम इस्माईल व अफशान मुकरी; प्रभाग 6 मध्ये स्नेहल पाटील, मंगेश कासारे, रीना पाटील व तनिषा पाटील; प्रभाग 7 मध्ये शाईस्ता कादरी, प्रार्थना म्हात्रे, रवी भोईर, शादाब शेख व अशमील मुकरी; प्रभाग 8 मध्ये पूर्वा वैवडे, विना तलरेजा, रोहित पाटील व विजय जाधव; प्रभाग 9 मध्ये गणेश पाटील, हेमंत पाटील, सायली पाटेकर व यशस्वी म्हात्रे; तर प्रभाग 10 मध्ये राजेश ठाकूर, ओमकार घरत, सायली म्हात्रे, कमल पाटील, दमयंती म्हात्रे व लता पाटील अशा 48 उमेदवारांची निवडणूक लढत निश्चित झाली आहे.

दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 1 आणि नगरसेवक पदासाठी 4 उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रत्येक प्रभागातील स्पर्धा सुटसुटीत झाली असली तरीही मतांचे तिढे व गणित गुंतागुंतीचे बनले आहेत. अनेक प्रभागांत भाजप व महाविकास आघाडी यांच्यात थेट आमनेसामने लढत दिसत असली तरी शिंदे गट आणि अपक्ष उमेदवारांचे अस्तित्व निर्णायक ठरू शकते.


उरण शहरात वेगवेगळे समस्या असून उरण शहरातील महिलांसाठी स्वच्छतागृहाचा अभाव, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, हॉस्पिटल, वाढते अपघात, कचऱ्याची समस्या, विजेचा लपंडाव, रस्त्याची दुरवस्था, करप्रणाली, स्वच्छता, आरोग्यसेवा यांसारख्या महत्वाच्या स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे. येत्या काही दिवसांत प्रचार तापमान कमालीचे चढणार हे निश्चित आहे आता सर्वांचा कौल कोणाला मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.


 Give Feedback



 जाहिराती