सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरेंशी फारकत घेणाऱ्या काँग्रेससोबत जाण्यास शरद पवारांचा नकार, राज-उद्धवशी युती करण्याचे संकेत
  • काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा टोला
  • मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई; घेतलेले पैसे वसूल होणार!
 जिल्हा

रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    24-11-2025 10:51:45

उरण :श्रीमदपुरुषार्थ ग्रंथामध्ये सांगितल्या प्रमाणे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. कारण परमात्म्याला आवडणाऱ्या ९ थेंबा पैकी एक थेंब म्हणजेच रक्ताचा थेंब आहे. ह्या दानामुळे परमात्म्याची कृपा प्राप्त होते व पुण्यसंचयही होतो. या विचारनुसार श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन व दिलासा मेडिकल ट्रस्ट व सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र उरण मुळेखंड तर्फे उरण नगर पालिका शाळा नंबर १ उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण १७६ रक्तदात्यांनी भाग घेतला त्यामध्ये    २३ रक्तदाते काही कारणास्तव रिजेक्ट करण्यात आले.जे रक्तदाते आले होते त्यांचे आयोजकांच्या वतीने स्वागत करून आभार मानण्यात आले.एकंदरीत १५३ जणांनी रक्तदान केले.


 Give Feedback



 जाहिराती