सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ठाकरेंशी फारकत घेणाऱ्या काँग्रेससोबत जाण्यास शरद पवारांचा नकार, राज-उद्धवशी युती करण्याचे संकेत
  • काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा टोला
  • मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई; घेतलेले पैसे वसूल होणार!
 जिल्हा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘ॲग्रो व्हिजन’ कृषी प्रदर्शनास भेट

डिजिटल पुणे    24-11-2025 11:01:43

नागपूर : मध्य भारतातील शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या आणि नागपुरात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन -2025’ या कृषी प्रदर्शनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रदर्शनीतील कृषी उत्पादने आणि पूरक उद्योगांच्या दालनांची पाहणी करून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी ‘ॲग्रो व्हिजन’ कृषी प्रदर्शनाच्या कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात या प्रदर्शनाचे प्रणेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार, अॅग्रो व्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर तसेच अॅग्रो व्हिजन सल्लागार परिषदेचे चेअरमन डॉ. सी. डी. मायी हे मान्यवर उपस्थित होते. अॅग्रो व्हिजनचे हे आतापर्यंतचे सोळावे प्रदर्शन आहे. याशिवाय फाऊंडेशनला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदर्शनातील विविध संस्था आणि कंपन्यांच्या दालनांना भेट दिली. विशेषतः मुख्यमंत्र्यांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती जाणून घेतली.


 Give Feedback



 जाहिराती