उरण : रवी शेठ भोईर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते मात्र महिला आरक्षण पडल्याने त्यांना वार्ड क्रमांक सात मधून नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज भरावी लागली. हे मटेरियल आमदारकीचे होते. कोणाला हॉस्पिटल ची गरज पडली कोणाला पोलीस स्टेशनची गरज पडली किंवा कोणत्याही अडी अडचणीत धावून जाणारे नेतृत्व म्हणून रवीशेठ भोईर सर्वपरिचित आहेत त्यामुळे अडचणीत असणारी प्रत्येक व्यक्ती पहिले रवीशेठ भोईर यांना भेटत असते .रवीशेठ भोईर हे एका शहरा पुरते मर्यादित नसून ते तालुक्याचे नेते आहेत. जात धर्म पंथ भाषा सोडून त्याच्या पलीकडे जाऊन विकासासाठी काम करणारी ही भारतीय जनता पार्टीची टीम आहे.निवडणूक हे निमित्त आहे. निवडणूक हे प्रतिनिधी नगरपरिषदेत पाठविण्याचे माध्यम आहे. नगर परिषदेत जे नगरसेवक बनलेत व जे बनणार आहेत ते नुसते शोभेचे कारण नसून ही समाजसेवेची एक संधी आहे हे माननारी ही टीम आहे. म्हणूनच आपण सर्व उभे राहिलेल्या भाजप महायुतीच्या सर्व उमेदवारांचा प्रचार करायचा आहे. असे प्रतिपादन महेशशेठ बालदी यांनी उरण कोटनाका येथे केले.
उरण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ६ अ चे उमेदवार स्नेहल भीमदास कासारे, प्रभाग क्रमांक ६ ब चे उमेदवार रीना निलेश पाटील,प्रभाग क्रमांक ७ अ चे उमेदवार शाहिस्ता इब्राहिम कादरी,प्रभाग क्रमांक ७ ब चे उमेदवार रवि यशवंत भोईर यांच्या प्रचारार्थ उरण कोटनाका बुरुडआळी येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आ. महेशशेठ बालदी,भाजप शहराध्यक्ष कौशिक शहा,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शोभा कोळी (शाह),माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, रवि यशवंत भोईर, शाहिस्ता इब्राहिम कादरी,स्नेहल कासारे, गणेश पाटील,रीना पाटील, रेयान तुंगेकर, राजू खान, तारीफ भाईजी,जसीम गॅस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महेश बालदी म्हणाले की आम्ही मत मागतो कारण आमच्या काळात अटल सेतू झाला. उरणच्या विकासासाठी शंभर कोटी आणले कधी जातीपतीचे राजकारण केले नाही आजही नगरसेवक पदासाठी मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे सुसज्ज व भव्य असे नगरपरिषदेचे इमारत बांधले आहे उरण शहरात चांगले रस्ते बांधण्यात आले आहेत बायपास रस्त्याचे काम सुद्धा प्रगतीपथावर आहे तोही लवकरात लवकर रस्ता सुरू होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव मिळावे म्हणून आम्ही प्रयत्न केले. रेल्वे सेवा सुरु केली.रेल्वे सेवेचा दररोज २०, ००० नागरिकांना फायदा होत आहे. शहरात मच्छी मार्केटच्या पाठीमागे कोणी बांधले नसेल असे समाज मंदिर बांधले,फुल मार्केट बांधले .
टाऊनहॉलचे काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. लाडकि बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला असे अनेक कामे आम्ही केले आहेत त्यामुळे या कामाच्या जोरावर जनता आम्हाला परत निवडून देईल असा विश्वास व्यक्त करत महेशशेठ बालदी यांनी विरोधकांचा भरपूर समाचार घेतला.फेसबुक सोशल मीडियावर कचऱ्याचे फोटो टाकून इतर फोटो व्हिडिओ टाकून काहीही होत नाही. त्यासाठी विकास कामे करावी लागतात. निधी आणावी लागते. जे विरोधकांना करणे अशक्य आहे.भाजप महायुतीच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते कचरा आम्ही साफ करून येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच विजय मिळवू.विजय आपलाच आहे असे सांगत ३ डिसेंबर रोजी सर्वांनी विजयाची दिवाळी साजरी करा असे आवाहन महेशशेठ बालदी यांनी केले.या सभेला प्रभाग क्रमांक ६ व ७ मधील नागरिक, ग्रामस्थ, भाजप महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.