नाशिक :नाशिक जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले असून वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. इंदिरानगर पोलिसांनी वाहन तपासणीदरम्यान कारमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र आढळल्यानंतर हा प्रकार समोर आला. नाशिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान करणारे रॅकेट उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. कारमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रासह डॉक्टर देखील यात आढळून आले आहे. या घटनेने नाशिकसह वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. चाळीसगावचे डॉ. बाळासाहेब पाटील यांच्यावर PCPNDT कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांच्या वाहन तपासणीत 17 मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान आता हा गुन्हा सिद्ध झाला असून पुढील कारवाई पोलीस करत आहे.
चाळीसगावचे डॉ. बाळासाहेब पाटील यांच्यावर PCPNDT कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 मार्च रोजी उघड झालेल्या या प्रकरणात यंत्राचा वापर करून अवैध पद्धतीने गर्भलिंग निदान केल्याचा आरोप असून गुन्हा सिद्ध झाल्यानंतर पुढील कारवाई सुरू आहे.दरम्यान, परवानगीशिवाय सोनोग्राफी यंत्र विक्री केल्याबद्दल GE Healthcare कंपनीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंत्र जप्त करण्यात आले असून महापालिकेच्या चौकशीत कलम 3, 6, 18, 23, 25, 26, 29 अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी दोषी ठरल्यास संबंधित डॉक्टरला पाच वर्षांपर्यंत शिक्षा आणि वैद्यकीय परवाना रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तसेच, विनापरवाना सोनोग्राफी यंत्र विक्री केल्याप्रकरणी GE Healthcare कंपनीवरही गुन्हा दाखल करून तिला सहआरोपी करण्यात आले आहे. पोर्टेबल यंत्र जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. आरोपी डॉक्टरांविरोधात पुण्यातही तक्रार असल्याची माहिती समोर आली आहे.पुण्यातही तक्रार दाखल असल्याची माहिती आहे. मात्र परवानगीशिवाय यंत्र विक्री व वाहतूक करत गुन्हेगारी केल्यानं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.