उरण : उरण तालुक्यातील पुनाडे गावचे शिक्षक ना.शं.घरत यांनी सेवा काळात ज्या ज्या शाळांवर सेवा केली त्या त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरच नव्हे तर पालकांवर देखील त्यांच्या शिक्षण पध्दतीने प्रभावित केले होते.सेवानिवृत्तीनौतर वयाच्या ८१ वर्षीही विद्यार्थ्यांना गणित विषयात मार्गदर्शन करीत आहेत.अशा सेवेत राहणारे ते तपस्वी आहेत,असे विचार साहित्यरत्न रायगडभूषण प्रा एल बी पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले.ते ना.शं.पाटील यांच्या " पावलां पावलांवर घडत गेलो " या पुस्तकाच्या प्रकाशना समारंभात बोलत होते.या पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य ग.ह.ठाकूर यांच्या हस्ते झाले.प्रास्ताविक के.पां.म्हात्रे यांनी मानले तर देविदास पाटील यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले.
"सेवेत असताना अनेकांच्या सहकार्यामुळे मेहनत करणे सोपे झाले ".असे विचार आपल्या मनोगतात ना.शं.पाटील गुरुजींनी मांडले.यावेळी गटशिक्षणाधिकारी निर्मला घरत, जयवंती पाटील ,ग्रामस्थ ना.क.पाटील, आणि दिलीप पाटील हातमोडे गजानन,महादेव भोईर या गुरुजींच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील गुरुजींचं महत्व सांगून उपस्थितांना प्रभावित केले.यावेळी सूर्यकांत डाकी, मच्छिंद्र घरत,एल.एन.भगत,पूर्वा प्रसाद, अभिमन्यू ठाकूर, दर्शन मोकल, द्वारकानाथ पाटील,रसिक पाटील, जनार्दन ठाकूर, अविनाश पाटील इत्यादी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.