नाशिक : भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत केली त्यानंतर ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. संविधान दिवस प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे, भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते संविधान चित्ररथास हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून मार्गस्थ करण्यात आले.यावेळी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर व मुकेश कानडे उपस्थित होते. हा चित्ररथ जिल्ह्यात फिरणार असून यामुळे भारतीय संविधानाचे महत्त्व आणि मूल्ये लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.