सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षणाबाबत आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
  • शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
  • 'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
 व्यक्ती विशेष

श्रीरंग बारणे यांचे उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे जनतेला आवाहन

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    28-11-2025 11:11:59

उरण : उरण नगर परिषद निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार असून शिवसेना महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपाली तुषार ठाकूर व इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या हे सर्व उमेदवारांना निवडून दिल्यास हे सर्व उमेदवार नगर परिषदेमध्ये चांगले काम करतील सर्व उमेदवार चांगले दिलेत निवडणुकीत जय पराजय असतोच. निवडणूक ही चांगले काम काय आहे वाईट काम काय आहे हे दाखवण्यासाठी असते उरणच्या जनतेला जाहीरपणे आवाहन करतो की येत्या दोन तारखेला धनुष्यबाणाचे बटन दाबून सर्व उमेदवाराना निवडून द्या असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण येथे केले. 

 उरण नगरपरिषद निवडणूक २०२५ संदर्भात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपाली तुषार ठाकूर प्रभाग क्रमांक १ ब चे नगरसेवक पदाचे उमेदवार अनंत मधुकर कोळी, प्रभाग ३ ब चे उमेदवार तुषार शंकर ठाकूर,प्रभाग क्रमांक ४ चे हंसराज महादेव चव्हाण, प्रभाग क्रमांक ७ ब चे उमेदवार अशमिल मोहम्मद अली मुकरी या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक २७ /११/२०२५  रोजी गणपती चौक येथे श्रीराम मंदिराच्या सभागृहात शिवसेना महायुतीच्या वतीने प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी आपले मत व्यक्त केले.

 प्रचार सभे प्रसंगी व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे,शिवसेनेचे महाराष्ट्र सचिव राहुल लोंढे,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, उपजिल्हाप्रमुख विनोद साबळे,  उरण विधानसभा संपर्कप्रमुख रमेश म्हात्रे,जिल्हा संघटक मेघा दमडे,उपजिल्हा संघटक वैजयंती ठाकूर, युवा सेना जिल्हा संघटक प्रीतम सुर्वे,पनवेल ग्रामीण तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, उरण तालुकाप्रमुख दीपक ठाकूर,शहर प्रमुख सुलेमान शेख, सुनिल भोईर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.एका प्रचार सभेत भाजपचे आमदार महेश बालदी यांनी शिवसेना व खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर टीका केली होती त्यावर बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले कि मि माझ्या आयुष्यात मी कोणाशी वैर केले नाही दुश्मनी केली नाही.माझा कोणी शत्रू नाही.

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो कोणी कोणाचा कायमचा मित्रही नसतो. जशी परिस्थिती असेल तसे भूमिका बदलावे लागतात. रायगडात अनेक ठिकाणी शिवसेनेचे सोबत मिळून भाजपा निवडणूक लढवत आहे.अनेक ठिकाणी भाजपा स्व बळावर निवडणूक लढवीत आहे. उरण मध्ये शिवसेनेचे पक्षाचे उमेदवारांना विश्वासात घेतले गेले नाही व चर्चा करून सुद्धा योग्य ते प्रतिसाद  मिळाला नाही. त्यामुळे शिवसेना महायुतीचे उमेदवार स्वतंत्र लढत आहेत. भाजपा कडे कडे प्रस्ताव पाठविला होता मात्र त्यांनी कोणतेही योग्य ते प्रतिसाद दिले नाही त्यामुळे शिवसेनेला उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढायला लागत आहे उरण मधील भाजपा  संदर्भात व महेश बालदी यांच्या संदर्भात मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे

.माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार करू नका असे सांगितले मात्र उरण मध्ये कोण भ्रष्टाचार करीत आहे हे सर्वांना माहित आहे मी कोणत्याही कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार कडून कमिशन खाल्ले नाही.टक्केवारी मागितली नाही. कोणाचा चहा देखील पिला नाही. आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहोत.सर्वांनी उभे असलेल्या उमेदवारांवर भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन बारणे यांनी यावेळी केले. शिवसेनेचे नाव घेऊन टीका करतात त्यांना शिवसेना कधी माफ करणार नाही असेही खासदार बारणे यांनी आपल्या भाषणातून सत्ताधारी पक्षाला इशारा दिला आहे. 


सर्वप्रथम प्रास्ताविक मध्ये तालुकाप्रमुख दीपक ठाकूर यांनी शिवसेना महायुतीचे उमेदवारांची ओळख करून दिली.पक्षाची भूमिका काय आहे ते सगळ्यांना सांगितले. भाजपने शिवसेना व खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर केलेल्या टिकेला दिपक ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले. कोणतेही पक्षाच्या नेत्यांनी आमच्या पक्षाच्या नेत्यावर टीका केली तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल.आरे ला कारे करण्याचे आमच्यात धमक व हिंमत आहे त्यामुळे आमच्या पक्षाच्या नेत्यांवर कोणी टीका करू नये असा आक्रमक इशारा दीपक ठाकूर यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदार महेश बालदी यांना दिला.
 यावेळी उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी आक्रमक भूमिका घेत आमदार महेश बालदी व सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले.

उरण मध्ये पहिल्यांदाच श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवीत आहोत कोणत्या पक्षाच्या विरोधात आम्ही लढत नाहीत एका प्रवृत्तीच्या विरोधात हा लढा आहे भाजपने शिवसेनेला कधी पुढे जाऊ दिले नाही,शिवसेनेला नेहमी मागे खेचण्याचे काम भाजपने केले.महेश बालदी यांनी त्यांच्या नगरसेवकला महिन्याला दीड लाख रुपये कधी दिले का मात्र आमच्या पक्षात पक्ष प्रवेश करणाऱ्यांना पक्ष प्रवेश करू नये म्हणून त्यांना काम धंदे देऊन महिन्याला एक ते दिड लाख रुपये देत आहेत शिवसेना वाढू नये म्हणून भाजपने प्रयत्न केले. सहा हजार कोटीची विकास कामे केले आहेत असे महेश बालदी सांगतात ते  पैसे कुठे गेले माहित नाही उरण बायपास रस्ताचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले.पण त्या बायपास रस्त्याचे अजूनही उद्घाटन झाले नाही. गटार रस्ते पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.आजच्या २१ व्या शतकात ही नागरिकांना स्वच्छतेचे आरोग्याच्या मुलभूत सुविधा मिळत नाहीत हाच का उरणचा विकास असा सवाल अतुल भगत यांनी उपस्थित केला.

 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपाली तुषार ठाकूर यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये सत्ताधारी पक्षाने केलेल्या उरणच्या विकासाची चिरफाड केली त्यांनी उरण मधील विविध नागरी समस्या वर बोट दाखवत वीज पाणी रस्ते स्वच्छतागृह आदी विषयावर आवाज उठविला.२०१७ साली भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनामात दिलेल्या आश्वासनांची पोलखोल केली.वीस वर्षे सत्ता भोगूनही उरण शहरात साधे स्वच्छतागृह उभारले जात नाही, डम्पिंग ग्राउंडची सोय नाही.उरणच्या विकासासाठी येणारा पैसा कोणाच्या खिशात जातो आहे,टक्केवारी कोण घेतो याचा हिशोब जनता घेणार आहे. पावसाळ्यात बस अडकले तेव्हा बसला आमदार धक्का मारतात त्यावरून उरणचा किती विकास झाला हे समजते.अनेक कागदपत्र मध्ये विकासकामांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आहे.निधी येतो मात्र काम होत नाही असा आरोप रुपाली ठाकूर यांनी केला आहे.


 Give Feedback



 जाहिराती