सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
  • 'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
 जिल्हा

ज्ञानोबा माऊलीचे कार्य सातासमुद्रापार स्टॅण्डफोर्ड विद्यापीठात नेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

डिजिटल पुणे    28-11-2025 11:18:38

मुंबई : सर्व समाजासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडणाऱ्या ज्ञानोबा माऊली यांचे कार्य साता समुद्रापार स्टॅण्डफोर्ड विद्यापीठात नेण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आज “मोगरा फुलला” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात गणेश शिंदे व संच यांनी सादरीकरण केले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये तालुकास्तरीय कार्यक्रम, मोगरा फुलला हा जिल्हास्तरीय कार्यक्रम, नाट्य, विद्वत्त परिषद, विमोचन विविध राज्यांमध्ये कार्यक्रम, नाणे व  टपाल तिकीट इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या “मोगरा फुलला” या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.


 Give Feedback



 जाहिराती