सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षणाबाबत आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
  • शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
  • 'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
 DIGITAL PUNE NEWS

‘महा-देवा फुटबॉल उपक्रम’अंतर्गत निवडक ६० विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार – क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

डिजिटल पुणे    28-11-2025 11:21:29

मुंबई : राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील फुटबॉलमधील प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी “महादेवा फुटबॉल उपक्रम” अंतर्गत निवड झालेल्या ६० मुला-मुलींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा),वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्यूआयएफए) आणि व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) यांच्यात  सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ  प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, फिटनेस मॉड्यूल तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक खेळाडूला योग्य संधी, सक्षम मार्गदर्शन आणि दर्जेदार सुविधा देण्यात येणार असल्याचे क्रीडामंत्री कोकाटे यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती