धुळे : विद्यार्थिनींना संकट समयी स्व- संरक्षण करता यावे म्हणून जिल्हा प्रशासनाने वीरांगना प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला. या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी स्व – संरक्षण प्रशिक्षणास विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर गुरुवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय वीरांगना प्रशिक्षणास मुख्य प्रशिक्षक शिफूजी शौर्य भारद्वाज जवळपास दहा हजारांवर विद्यार्थिंनींना प्रशिक्षण देत आहेत.
दुसऱ्या दिवसीय प्रशिक्षण सत्रास जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अधीक्षक अभियंता अनिल पवार, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय बागडे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील (प्रशासन), उप जिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षक स्वामी काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर (धुळे), तहसीलदार साहेबराव सोनवणे, अरुण शेवाळे, अपर तहसीलदार वैशाली हिंगे आदी उपस्थित होते.
दुसऱ्या दिवसाच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते झाले. मुख्य प्रशिक्षक शिफूजी यांनी विद्यार्थिनींना ओळखपत्र, बांगडी, कौल अशा जवळपास आढळून येणाऱ्या विविध वस्तूंपासून स्व- संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. शिक्षण विस्तार अधिकारी रंजना धिवरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, विविध विद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.