मुंबई : राज्यातील २२ नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे अचानक पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दोन आठवड्यांपासून जोरात सुरू असलेला प्रचार अचानक थांबल्याने कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. स्थगित झालेल्या ठिकाणी आता २० डिसेंबरला मतदान तर २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणी २ डिसेंबरलाच नियोजित वेळापत्रकानुसार मतदान होणार आहे.
फडणवीसांचा निवडणूक आयोगावर आरोप
या निर्णयावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.“उद्या मतदान असताना आजच निवडणुका स्थगित करणे चुकीचे आहे. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. माझ्या माहितीनुसार अशा रीतीने निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत,” असा आरोप फडणवीसांनी केला.ते पुढे म्हणाले, “अनेक उमेदवारांचा प्रचार वाया गेला. निवडणूक आयोग स्वायत्त असला तरी अशा पद्धतीचे निर्णय चुकीचेच आहेत. आम्ही निवडणूक आयोगाकडे रिप्रेझेंटेशन देणार आहोत.”
निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय. ते मला माहित नाही, माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं आहे. उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे. अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. याबद्दल रिप्रेझंटेशन आम्ही निवडणुक आयोगाला देऊ, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
22 नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकांना स्थगिती – विभागनिहाय यादी
अमरावती विभाग
बाळापूर
अंजनगाव सुर्जी
यवतमाळ
देऊळगाव राजा
वाशिम
कोकण विभाग
अंबरनाथ
छ. संभाजीनगर विभाग
फुलंब्री
धर्माबाद
मुखेड
रेणापूर
वसमत
नागपूर विभाग
घुग्घूस
देवळी
नाशिक विभाग
देवळाली–प्रवरा
कोपरगाव
पाथर्डी
नेवासा
पुणे विभाग
बारामती
फुरसुंगी–उरळी देवाची
महाबळेश्वर
फलटण
मंगळवेढा
अणगर
नगरपालिका–नगरपंचायत निवडणुका : एक नजर
एकूण घोषणा : 288
बिनविरोध निवड : 3
स्थगित : 22
उद्या मतदान : 253
आज प्रचाराचा शेवटचा दिवस
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला नगरपलिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बड्या नेत्यांच्या आज सभा पार पडणार आहेत. मुख्यमंत्र्यांची संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बीडमध्ये सभा होणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाशिकच्या त्रंबकेश्वर, संभाजीनगरमध्ये तर अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यसह नाशिकच्या भगूरमध्ये सभा होणार आहे..नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून रात्री 10 नंतर प्रचार बंद होणार आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच अनेक बडे नेते आज विविध जिल्ह्यांत सभा घेणार आहेत. त्यामुळे शेवटचा प्रचारदिवस किती गाजतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.