सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पैशांवरून वाद विकोपाला, पतीकडून बिहार अन् कॅनडातून पत्र पाठवत पत्नीला 'तिहेरी तलाक' देण्याचा प्रयत्न; नाशिकमध्ये खळबळ
  • मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ
  • अजितदादा-शिंदेंसह 20 नेत्यांच्या अडचणी वाढल्या, मतदारांना प्रलोभनं देण्याच्या वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल
  • उद्या निवडणुका अन् आज पुढे ढकलल्या ही चूक; देवेंद्र फडणवीसांचे निवडणूक आयोगावर आक्षेप
 जिल्हा

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ पवित्र दान : महेंद्रशेठ घरत

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    01-12-2025 17:22:44

उरण : "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ पवित्र दान आहे. त्यामुळे अनेकांना जीवदान मिळते. गरीब असो वा श्रीमंत, कुणालाही परिस्थितीनुरूप रक्ताची गरज लागते. त्यामुळे रक्तदान शिबिर भरवण्याचे न्हावाशेवा सी.एच.ए. आधार सामाजिक संघटनेचे काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. गेली अनेक वर्षे संघटनेचा सुरू असलेला उपक्रम कौतुकास्पद आहे," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत पिरकोन येथे म्हणाले. रक्तदान शिबिराचे आयोजन पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात तेरणा ब्लड बॅंक नेरूळच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी न्हावाशेवा सी. एच. ए. आधार सामाजिक संघटनेतर्फे महेंद्रशेठ घरत यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे,  अविनाश ठाकूर तसेच कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच न्हावाशेवा सी.एच.ए. आधार सामाजिक संघटनेचे सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती