उरण : उरण नगरपरिषदेचे सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाली निकाल ३ डिसेंबर २०२५ लागणार होते मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उरण नगरपरिषदेच्या निकाल २१ डिसेंबर २०२५ लागणार आहे. न्यायालयाने मतपेटी या कडक बंदोबस्त मध्ये ठेवण्यात यावेत असे आदेश दिल्याने उरण नगरपरिषदेत स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आले असून या स्ट्रॉंग रूममध्ये मतपेटी सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. स्ट्रॉंग रूमसाठी २४ तास कडक पोलिस बंदोबस्त असून एक ए पी आय व १२ अंमलदार दिवसासाठी कार्यरत आहेत तर रात्री एक अधिकारी वीस पोलीस कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश देवरे यांनी दिली आहे.
उरण नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूममध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत असून एकूण आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्ट्रॉंग रूम वर,मतपेटीवर लक्ष ठेवले जात आहे. राजकीय पक्षाचे प्रतिनिधी कधीही येऊन जाऊ शकतात. बघून जाऊ शकतात त्यांचे रजिस्टर वेगळे ठेवले आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली आहे. स्ट्रॉंग रूमसाठी उरण पोलिसांचा कडक बंदोबस्त असून महाराष्ट्र शासनातर्फे योग्य ती खबरदारीचे उपायोजना स्ट्राँग रूमसाठी करण्यात आले आहेत.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करून स्ट्रॉंग रूम व मतपेटी सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.