उरण : गेली अनेक दिवसापासून उरण ते नेरुळ व उरण ते बेलापूर या मार्गांवर रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात यावेत अशी मागणी प्रवाशी वर्ग, नागरिक, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्था सामाजिक संघटनानीं केली होती.त्या मागणीला आता यश आले आहे. रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात यावेत यासाठी आमदार महेश बालदी, भाजपचे युवा नेते प्रितम म्हात्रे यांनी पाठपुरावा, पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला, पत्रव्यवहाराला आता यश आले आहे.या निर्णयामुळे आता प्रवाशी वर्गांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. उरण ते नेरुळ व उरण ते बेलापूर या मार्गावर पहाटे ५ वाजल्यापासून रेल्वे सुरु करण्यात यावे व नेरुळ व बेलापूर येथून उरणला येण्यासाठी शेवटची रेल्वे रात्री ११ वाजताची असावी अशी मागणी प्रवाशी वर्गांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या प्रगत आणि सर्वसमावेशक विकासासाठी सतत प्रयत्न करणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठपुराव्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी नेरुळ–उरण–नेरुळ (4 फेऱ्या), बेलापूर–उरण–बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.तसेच तरघर आणि गव्हाण येथे नवीन रेल्वे स्टेशन स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.या निर्णयामुळेमुंबई नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मा. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी, आणि मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी — माझ्या निवेदनाला मान देऊन उरण-नेरूळ रेल्वे फेऱ्यांत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल सर्वांचे मी मनःपूर्वक आभारी आहे.या सर्वांच्या पुढाकारामुळे नेरुळ–उरण–नेरुळ 4 अतिरिक्त फेऱ्या तसेच बेलापूर–उरण–बेलापूर 6 अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत.तसेच तरघर आणि गव्हाण येथे नवीन स्टेशनांना मंजुरी मिळाली आहे.हा निर्णय नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील लाखो प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरेल. रोजच्या प्रवासातील वेळ, खर्च आणि कष्ट कमी करण्यासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची ठरेल.मुंबईकरांच्या, नवी मुंबई करांच्या व उरणच्या जनतेसाठी सुविधेसाठी घेतलेल्या या लोकहिताच्या निर्णयाबद्दल मी देशाचे पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्र मोदीजी, अश्विनी वैष्णवजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. - महेश बालदी, आमदार उरण विधानसभा मतदार संघ.
रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या समाधान वाटले. आनंद झाले. यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.परंतु उरण वरून नेरुळ व बेलापूर जाण्यासाठी पहाटे लवकर रेल्वे फेऱ्या नाहीत, सुविधा नाहीत तसेच नेरुळ, बेलापूर येथून उरणला जाण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत रेल्वे सेवा नाही. त्यामुळे प्रवाशी वर्गांचे खूप हाल होतात. आमची शासनाला विनंती आहे कि पहाटे ५ वाजता उरण हुन नेरुळ, बेलापूर जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरु व्हावे तसेच रात्री नेरुळ व बेलापूर रेल्वे स्टेशन वरून उरणला जाण्यासाठी शेवटची रेल्वे ११ वाजताची असावी अशी आम्हा प्रवाशांची मागणी आहे. - हर्षल म्हात्रे, उरण, रेल्वे प्रवाशी