पुणे : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे 'रोटरी पीस कॉन्फरन्स' ही परिषद दि.१७ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेचा भाग म्हणून लेखन संशोधन स्पर्धा, कला महोत्सव आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन विविध गटांसाठी करण्यात आले आहे.
तरुण लेखकांसाठी पीसक्वेस्ट निबंध स्पर्धा असून पंचविशीपुढील संशोधकांना सौहार्द, सहानुभूती, शाश्वत शांतता तसेच शांततामय समाजनिर्मितीत युवक, कला आणि तत्त्वज्ञानाची भूमिका या विषयांवर संशोधनपत्रे सादर करता येतील. कलावंतांसाठी पीस आर्ट फेस्टिव्हल आणि लघुपट स्पर्धा उपलब्ध आहेत. सहभागीांना एकोपा, शाश्वतता, करुणा आणि शांतता यांवर आधारित चित्रे, इन्स्टॉलेशन्स, छायाचित्रे, डिजिटल कलाकृती किंवा लघुपट सादर करता येतील.निबंध, संशोधन आणि लघुपट सादरीकरणाची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२५ आहे. कला महोत्सवासाठी प्रवेशिका ३० डिसेंबर २०२५ पर्यंत स्वीकारण्यात येतील.विद्यार्थी, संशोधक, चित्रपट निर्माते आणि कलाकार यांनी आपापल्या प्रवेशिका दिलेल्या अंतिम तारखांपूर्वी सादर कराव्यात. पीस कॉन्फरन्सला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या प्रतिनिधींनी www.rotarypeace3131.in संकेतस्थळावर नोंदणी करावी .अधिक माहितीसाठी [email protected] ईमेल द्वारे संपर्क साधावा. किंवा ९१४६१६०३०३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
'रोटरी पीस कॉन्फरन्स' हा संवाद, सर्जनशीलता आणि युवकांच्या सहभागाद्वारे शांतता निर्माण करण्यावर केंद्रित हा व्यापक उपक्रम आहे. यात पीस कॉन्फरन्स, युवकांसाठी लेखन स्पर्धा, कला महोत्सव आणि लघुपट स्पर्धेचा समावेश असून विद्यार्थी, संशोधक, कलाकार आणि शांततादूत यांना एका व्यासपीठावर रचनात्मक आणि प्रेरणादायी उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
पीस कॉन्फरन्समध्ये कार्यशाळा, पॅनेल चर्चासत्रे, प्रदर्शन, लघुपट प्रदर्शन आणि पीस पोल समारंभाचा समावेश असेल. सहानुभूती, विविधता, शाश्वतता आणि समुदाय-आधारित शांतता कृती यांवर संवाद प्रोत्साहित करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. रोटरी पीस कॉन्फरन्सचे उद्दिष्ट युवकांना माहित करून देणे , सर्जनशील अभिव्यक्तींना प्रोत्साहन देणे आणि शांतता हे दैनंदिन आचरण होईल अशी संस्कृती निर्माण करणे हे आहे.माध्यम प्रतिनिधी, शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि समुदाय संघटनांना सहभागी होण्याचे आणि हा संदेश व्यापकपणे पोहोचवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.