पुणे : महिला सक्षमीकरणासाठी ‘मैं भी सोनिया’ हा विशेष कार्यक्रम कोंढवा येथे आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्या सौ.मुबीना खान,अहमद खान आणि ए. एस. के. ग्रुप लोक दरबार यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम मंगळवार,९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता जनसंपर्क कार्यालय, शॉप नं. १, गीते अपार्टमेंट, कोंढवा मेन रोड, तेजस हॉल जवळ, कोंढवा खुर्द, पुणे येथे घेण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मोहन जोशी,विविध स्थानिक नेते उपस्थित राहणार असून महिला नेतृत्व आणि सक्षमीकरणाशी निगडित विविध उपक्रमांची रूपरेषा सादर केली जाणार आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहांतर्गत महिला सक्षमीकरणासाठी हा कार्यक्रम होणार आहे.
महिलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता, आरोग्य जनजागृती, आर्थिक सबलीकरण आणि सामाजिक सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.महिलांसाठी प्रोत्साहनपर संदेश, मार्गदर्शन आणि सहभागात्मक उपक्रम यामुळे कार्यक्रम अर्थपूर्ण होणार आहे.आयोजकांनी परिसरातील महिलांनी आणि नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून महिला सबलीकरणाला हातभार लावावा, असे आवाहन केले आहे.