सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गोरेगावातील जनतेसाठी नवी आशा, समाजसेवक संदीप जाधव यांच्यामुळे पाणीटंचाई आणि अंधाराचा प्रश्न सुटला
  • मस्साजोगमध्ये आजपासून 9 डिसेंबर काळा दिवस म्हणून पाळणार; अधिवेशनामध्ये संतोष देशमुख प्रकरणावर निवेदन दिलं जावं; धनंजय देशमुखांची मागणी
  • स्ट्राँग रुममध्ये EVM चा संशयास्पद आवाज, दोन्ही शिवसेनेचा आक्षेप, गोंधळानंतर आजपासून खडा पहारा
  • फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
  • उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; ZP अन् पंचायत समितीचा आढावा, मनसेबाबतही सूचना
 शहर

‘स्वरस्वप्न ' सांगीतिक कार्यक्रम १४ डिसेंबर रोजी ;भारतीय विद्या भवनमध्ये आयोजन

डिजिटल पुणे    09-12-2025 12:22:09

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘स्वरस्वप्न '  हा विशेष सांगीतिक   कार्यक्रम दि.१४ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR), उपक्षेत्रीय कार्यालय, पुणे यांच्या वतीने हा कार्यक्रम प्रस्तुत केला जात आहे.‘स्वरस्वप्न '   या कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन स्वप्ना दातार यांनी केले असून बंदिशी, सिने संगीत आणि रागरचनांच्या माध्यमातून सादर होणाऱ्या विविधरंगी सादरीकरणामुळे हा संगीतप्रेमींसाठी एक सुंदर अनुभव ठरणार आहे.  भारतीय विद्या भवनचे नातू सभागृह(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे. सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे,अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली. 

 


 Give Feedback



 जाहिराती