पुणे : विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, मराठी प्रकाशन विभाग, पुणे यांच्या वतीने प्रकाशित दोन नव्या पुस्तकांचा आणि नवीन वर्षाच्या दैनंदिनीचा प्रकाशन सोहळा रविवार,दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. सेवाभवन,पटवर्धन बाग चौक(एरंडवणे) येथे हा कार्यक्रम होणार आहे.या प्रकाशन सोहळ्यात सौ. सुहासिनी देशपांडे यांनी अनुवाद केलेल्या 'सनातन धर्म' पुस्तकाचे, डॉ. शरद कुलकर्णी लिखित 'पूर्णत्वाचे प्रवासी ' या पुस्तकाचे तसेच विवेक शलाका -२०२६ या दैनंदिनीचे प्रकाशन होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिरीष देशपांडे(मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलढाणा अर्बन पतसंस्था) तसेच राजेंद्र हिरेमठ(अध्यक्ष, जनसेवा सहकारी बँक) उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. निवेदिता भिडे(उपाध्यक्षा, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी) मार्गदर्शन करतील.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विवेकानंद केंद्राचे प्रकाशन विभागप्रमुख सुधीर जोगळेकर आणि विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांताचे संचालक किरण कीर्तने यांनी केले आहे.