सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • गोरेगावातील जनतेसाठी नवी आशा, समाजसेवक संदीप जाधव यांच्यामुळे पाणीटंचाई आणि अंधाराचा प्रश्न सुटला
  • मस्साजोगमध्ये आजपासून 9 डिसेंबर काळा दिवस म्हणून पाळणार; अधिवेशनामध्ये संतोष देशमुख प्रकरणावर निवेदन दिलं जावं; धनंजय देशमुखांची मागणी
  • स्ट्राँग रुममध्ये EVM चा संशयास्पद आवाज, दोन्ही शिवसेनेचा आक्षेप, गोंधळानंतर आजपासून खडा पहारा
  • फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
  • उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; ZP अन् पंचायत समितीचा आढावा, मनसेबाबतही सूचना
 शहर

कोंढव्यात महिला सक्षमीकरणाची जागृती ;'मै भी सोनिया' कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

डिजिटल पुणे    10-12-2025 15:43:37

पुणे : एएसके लोकदरबार आणि काँग्रेस कार्यकर्त्या सौ. मुबीना अहमद खान यांच्यातर्फे  कोंढवा परिसरात आयोजित 'मै भी  सोनिया' या महिला सक्षमीकरण जागृती कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी कोंढवा खुर्द येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून डॉ. कल्पना बळीवंत (उप आरोग्य अधिकारी, पुणे मनपा), शाहिन सिंदगी (सामाजिक कार्यकर्त्या) आणि आशिया पटेल (लाईट हाऊस इन्चार्ज, कोंढवा) उपस्थित होत्या.अहमद खान,असलम बागवान यांच्यासह नागरिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्व गुणांची माहिती सौ.मुबीना खान यांनी त्यांच्या भाषणातून दिली. महिलानी सर्वांगीण विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आयोजन, संचालन आणि व्यवस्थापन हे स्थानिक महिलांनीच यशस्वीपणे सांभाळले.कार्यक्रमात महिलांची सक्रिय भूमिका आणि जबाबदारी पार पाडण्याची क्षमता विशेषतः कौतुकास्पद ठरली. सुरुवातीपासून मंच संचालन, अतिथी स्वागत, सांस्कृतिक समन्वय, चर्चा सत्रे आणि संपूर्ण कार्यक्रमाची आखणी — प्रत्येक जबाबदारी महिलांनी उत्तमप्रकारे पार पाडली.

स्थानिक नागरिक आणि उपस्थित अतिथींनी महिलांच्या या नेतृत्वाचे मनापासून कौतुक केले आणि सांगितले की हा कार्यक्रम कोंढवा परिसरातील महिला सक्षमीकरणाचा आत्मविश्वास वाढवणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.महिलांनी सामाजिक, राजकीय आणि सामुदायिक क्षेत्रात आपली भूमिका अधिक मजबूत करत असा संदेशही दिला की संधी आणि विश्वास मिळाल्यास त्या कोणतेही मोठे आयोजन समर्थपणे सांभाळू शकतात.


 Give Feedback



 जाहिराती