पुणे : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने रामलीला मैदान ,दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वोट चोर, गद्दी छोड़’ या भव्य सभेत पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कोंढवा येथील अहमद खान यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातून अनेक कार्यकर्ते या सभेसाठी दिल्लीला उपस्थित होते.ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटीगाठी महाराष्ट्र सदन येथे झाल्या.
या वेळी भ्रष्ट सरकार आणि मतांची चोरी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून हाकलून लावण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. लोकशाही, संविधान आणि जनतेच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करीत असल्याचा संदेश या सभेतून देण्यात आला.
अहमद खान यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मांडलेले विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील, विविध उपक्रमातून काँग्रेस जनतेशी पुन्हा जोडून घेईल,असे सांगितले. काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या आक्रमक नियोजनामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.संघटना म्हणून आता हा पक्ष बळकट होत राहील.सामाजिक आणि पुरोगामी विचार जपण्यासाठी काँग्रेसचा मध्यम मार्ग उपयोगी असल्याचे असलम इसाक बागवान यांनी सांगितले.