पुणे : डोराबजी इस्टेट यांच्या प्रस्तुत व्होकल प्रायमर लीग – सीझन १ या कराओके आधारित गायन स्पर्धेचा भव्य अंतिम सामना रविवारी (१४ डिसेंबर २०२५) पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. एपिटोम, द मिल्स, पुणे येथे आयोजित या ग्रँड फिनालेचे यशस्वी आयोजन स्टुडिओ वर्क्स यांनी केले होते.
या अनोख्या कराओके लीगमध्ये पुण्यातील सहा नामांकित रेस्टॉरंट्सचे प्रतिनिधित्व करणारे सहा संघ सहभागी झाले होते. संगीत, मनोरंजन आणि स्पर्धात्मकतेचा सुरेख संगम साधणारी ही स्पर्धा पुणेकरांसाठी एक वेगळा व उत्साहवर्धक अनुभव ठरली.
अंतिम फेरीत टीम कुकू आणि टीम ग्रँड ओअॅसिस डायनॅमोज यांच्यात अटीतटीची लढत रंगली. दोन्ही संघांच्या दमदार कराओके सादरीकरणांनी प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळवली. मात्र अखेरच्या क्षणी प्रभावी सादरीकरण करत ग्रँड ओअॅसिस डायनॅमोज संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले.
विजयी संघ – ग्रँड ओअॅसिस डायनॅमोज
संघ कर्णधार: डॉ. राधिका वाघ
संघ मालक: श्री. विजय वाघारे

संघ सदस्य: डॉ. राधिका वाघ, कुमार राजगुरू पाटील, साक्षी बेंके, प्रतिक्षा लेंघे, पंकज झा, मेहेर मुल्लापुडी आणि अमन या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध सेलिब्रिटी परीक्षक मोनजॉय मुखर्जी यांच्यासह डॉ. जेकब गिल, विनया मॅडम आणि अंजली मॅडम यांनी केले. त्यांच्या अनुभवसंपन्न परीक्षणामुळे स्पर्धेला अधिक दर्जा व विश्वासार्हता लाभली.टाळ्यांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात ग्रँड फिनालेची सांगता झाली. व्होकल प्रायमर लीग – सीझन १ ने पुण्यातील कराओके कलाकारांसाठी एक प्रभावी मंच उपलब्ध करून दिला असून, भविष्यात आणखी भव्य पर्वांसाठी मजबूत पाया घातल्याचे आयोजकांनी सांगितले.