सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी विरोधात लढणार, निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्र्यांनी शड्डू ठोकला
  • मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
  • शेतात खेळताना अनर्थ घडला, दबा धरून बसलेल्या बिबट्याची 8 वर्षीय रोहितवर झडप; चिमुकल्याचा दुदैवी अंत
  • मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
  • मनपा निवडणुकांची आजच घोषणा, आजपासूनच आचारसंहिता?; हिवाळी अधिवेशन संपताच राज्य निवडणूक आयोगाने बोलावली पत्रकार परिषद
 जिल्हा

मनोर येथील ग्रामीण रुग्णालयातील गर्भवती मातेच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

डिजिटल पुणे    15-12-2025 15:46:03

नागपूर :   मनोर (जि. पालघर) येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने गर्भवती मातेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेची सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत चौकशी करण्यात आली असून चौकशीत दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत सांगितले.सदस्य सचिन अहिर यांनी विधान परिषदेत याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे यांनी सहभाग घेतला.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले, मनोर (जि. पालघर) ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या या घटनेची सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत केलेल्या चौकशीत दोषी आढळून आलेल्या तेथील स्त्री रोग तज्ज्ञ यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तर दोन कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांच्याही सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. तसेच येथील प्रभारी सर्जन यांची बदली करण्यात आली असून त्यांनी विभागीय चौकशी करण्यात येत आहे.

आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आरोग्य विभागाने दक्षता घेतली आहे. आदिवासी बहुल, डोंगरी, ग्रामीण भागातील रुग्णालयामधील डॉक्टरांची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी विभागामार्फत पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच या दुर्दैवी घटनेतील कुटुंबास चौकशीअंती आवश्यक मदत दिली जाईल, असेही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती