सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ऑनलाईन पत्ते खेळून झाले, शासनाला चुना लावून शिक्षाही झाली, आता तरी कोकाटेंचा राजीनामा घेणार का? रोहित पवारांचा सवाल
  • मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
  • महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवडमध्ये चक्रं फिरली, दोन्ही राष्ट्रवादींची बैठक, भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र
  • पिंपरीत भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटणार, मनसे-काँग्रेस एकत्र, अजित पवारांनाही निमंत्रण धाडलं
  • अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
  • समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला
  • ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार? संजय राऊतांनी मुहूर्त सांगितला, आजच राज ठाकरेंची भेट घेणार
 व्यक्ती विशेष

ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा लवकरच? संजय राऊतांनी सांगितला मुहूर्त, आज राज ठाकरेंची भेट

डिजिटल पुणे    16-12-2025 11:58:22

मुंबई :  राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागणार आहेत. आता याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंय. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकेमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तर संजय राऊत आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.   

संजय राऊत म्हणाले की, काल मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. त्यानंतर अंगात उत्साह संचारलेला आहे. ट्रीटमेंट चालूच राहील. पण, ही लढाई मराठी माणसाची शेवटची अस्मितेची लढाई आहे. मराठी माणूस कोणत्याही पदावर असो, कोणत्याही परिस्थितीत असो, त्याने या लढाईत मुंबई वाचवण्यासाठी उतरायला पाहिजे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही पोस्टर्स लागले आहेत. मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन करण्यासाठी पोस्टर्स लागलेत. त्यात कुठल्याही पक्षाचे नाव नाही. सरकारला भीती वाटली आणि त्यांनी एका रात्रीत हे पोस्टर काढायला लावले. का तर म्हणे आचारसंहितेचा भंग होत आहे. आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता विरोधी पक्षाला आणि या सरकारच्या लोकांना काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, आज संजय राऊत राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या भेटीत आगामी महापालिका निवडणुका, जागावाटप आणि संयुक्त प्रचार रणनीती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.संजय राऊत म्हणाले, “ही लढाई केवळ निवडणुकीची नाही, तर मराठी माणसाच्या अस्मितेची आहे. मुंबई वाचवण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने मैदानात उतरायला हवं.” त्यांनी सरकारवर आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबतही गंभीर आरोप केले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, मनसे आणि ठाकरे गटाची युतीची अद्याप घोषणा झालेली नाही. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढत आहेत. महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शाहांच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की, आमची युती करा, आमची युती करा, बाबा लगीन, बाबा लगीन... या क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकेमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत. बाकी इतर महापालिकेमध्ये स्थानिक पदाधिकारी निर्णय घेतील. ही लढाई 29 महापालिकांपेक्षा मुंबईची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत मुख्य लढाई हे मुंबईचीच होती. आम्ही मराठी लोकं पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत. पण, ही मुंबई आम्ही अमित शाहांच्या घशात जाऊ देणार नाही. या महाराष्ट्राला माहिती आहे की, रहमान डकैत कोण आहे? कोणाला मुंबई विकायची आहे. त्यांना पाठबळ देणारे कोण आहेत. मुंबईचं कराचीतील ल्यारी शहर कोणी केलेला आहे हे अख्या मुंबईला माहित आहे, असा घणाघात देखील संजय त्यांनी केला. 

येत्या आठवड्यात युतीची घोषणा व्हायला हरकत नाही. आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. दोन पक्षप्रमुख एकत्र येतात तेव्हा त्यांचा काहीतरी घोषणा करण्याचा कार्यक्रम ठरला असेल ना. काँग्रेस या क्षणी आमच्या सोबत आहे, असे मला दिसत नाही. बिहारच्या निकालानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्यांनी आमच्या सोबत मुंबईच्या लढाईत असायला हवे होते, ही आमची भूमिका आहे. आम्ही त्यांच्या वरिष्ठांची देखील बोललेलो आहे. पण, त्यांनी ती बाब नेहमीप्रमाणे स्थानिक पातळीवर सोडलेली आहे. स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचे आवाहन कायम असेल की, तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारच्या भूमिका मुंबईच्या लढाईत घेऊ नये. लोक हे विसरणार नाहीत. भविष्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका देखील येणार आहे ते लक्षात घ्या, असे म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. दरम्यान, राज ठाकरे यांची आज भेट घेणार असल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सत्ताधारी पक्ष खर्च मर्यादा पाळेल का, असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. “नगरपालिका निवडणुकांमध्ये कोट्यवधींचा खर्च करणारे सत्ताधारी फक्त 15 लाखांच्या मर्यादेत राहतील का?” असा सवाल त्यांनी केला.यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका करत म्हटले की, मुंबईच्या लढाईत काँग्रेसने स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती. “वेगळी चूल मांडून भाजपला अप्रत्यक्ष मदत होईल अशी भूमिका लोक विसरणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला.आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती