सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ऑनलाईन पत्ते खेळून झाले, शासनाला चुना लावून शिक्षाही झाली, आता तरी कोकाटेंचा राजीनामा घेणार का? रोहित पवारांचा सवाल
  • मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
  • महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवडमध्ये चक्रं फिरली, दोन्ही राष्ट्रवादींची बैठक, भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र
  • पिंपरीत भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटणार, मनसे-काँग्रेस एकत्र, अजित पवारांनाही निमंत्रण धाडलं
  • अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
  • समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला
  • ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होणार? संजय राऊतांनी मुहूर्त सांगितला, आजच राज ठाकरेंची भेट घेणार
 जिल्हा

प्रधान सचिव विजय वाघमारे यांची आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेस भेट

डिजिटल पुणे    16-12-2025 17:55:14

चंद्रपूर : आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी दि. 13 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेस सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी क्रीडा स्पर्धांचा सविस्तर आढावा घेत खेळाडू विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रधान सचिवांनी विभागीय विज्ञान प्रदर्शनीस भेट देत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांची पाहणी केली व त्यांचे कौतुक केले. तसेच क्रीडा स्पर्धेदरम्यान उभारण्यात आलेल्या आरोग्य कक्षास भेट देऊन वैद्यकीय सुविधा व खेळाडू विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक काळजीबाबत माहिती घेतली. यानंतर समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनीस भेट देत विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे व सर्जनशीलतेचे विशेष कौतुक केले.यावेळी विजय वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना खेळ, शिक्षण व आरोग्य यांचा समतोल राखण्याचा सल्ला देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून क्रीडा, विज्ञान व कौशल्य विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत

14 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे, ख्यातनाम झाडीपट्टी नाट्यकलावंत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून नगरपालिका प्रशासन अधिकारी विद्या गायकवाड, कलावंत तथा गायक अनिरुद्ध वनकर, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार,  दीपक हेडाऊ (भंडारा),  उमेश काशीद (देवरी) व उषा विकास राचेलवार उपस्थित होते.

आदिवासी विकास विभागातील एकूण 9 प्रकल्पांतील विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत आदिवासी संस्कृतीवर आधारित पारंपरिक नृत्य, गीत, वेशभूषा व लोककलेचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रभावी सादरीकरण करण्याची संधी मिळाली.

पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “या क्रीडा स्पर्धा केवळ शारीरिक क्षमतेचे नव्हे तर एकात्मता, शिस्त, संघभावना व सांस्कृतिक जाणीवेचे प्रतिबिंब आहेत. खेळ व कला यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा समतोल विकास होतो.” डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून अभ्यासात प्रगती करावी व उच्च पदांवर पोहोचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

खेळाडूंची दमदार कामगिरी

या स्पर्धेत आदिवासी विद्यार्थी ॲथलेटिक्स (धावणे, चालणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक) तसेच कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल या सांघिक खेळांत उत्कृष्ट कौशल्य सादर करत आहेत. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडविण्याचे प्रयत्न आदिवासी विकास विभागामार्फत सुरू आहेत.


 Give Feedback



 जाहिराती