पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यावर प्रस्थापित पक्षांच्या अजूनही चर्चा चालू असताना आम आदमी पार्टीने मात्र आपली पुणे शहरासाठी उमेदवार यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. पत्रकार परिषद घेत आप पुणे शहर समितीने महानगर पालिका निवडणूक २०२५- २६ साठीची पहिली २५ जणांची उमेदवार यादी जाहीर केली आहे.' गेल्या तीन वर्षापासून पुणे महानगरपालिका निवडणुका प्रलंबित होत्या. प्रशासकीय राज मध्ये बेबंद निर्णयपद्धती आणि मनमानी नागरिकांनी पाहिली.
सत्ता लाभासाठी वेगवेगळ्या प्रस्थापित पक्षांमध्ये युत्या आणि तोडफोड पाहिली. एक सांस्कृतिक, शैक्षणिक शहर असलेले पुणे, त्याची ओळख बदलून आता गुन्हेगारीचे, अपघातांचे शहर अशी झाली आहे.' ' त्यामुळे पुणेकरांना आता बदल हवा आहे आणि आम आदमी पार्टीच्या स्वरूपामध्ये हा पर्याय आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. यासाठी पुण्यामध्ये स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या जातील. जनतेच्या मूलभूत विकासाच्या प्रश्नांवरती म्हणजे वाहतूक कोंडी आरोग्य सोयी, दर्जेदार शिक्षण, भयमुक्त पुणे यावर प्रचारात भर दिला जाईल.' असे आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या प्रस्थापित पक्षांच्या रणधुमाळीत प्रामाणिक, इमानदार अशी स्वच्छ प्रतिमा घेऊन उतरलेल्या आम आदमी पार्टीला पुणेकर कसा प्रतिसाद देतात हा औत्सुक्याचा विषय आहे.
पुणे महानगरपालिका साठी आप अधिकृत उमेदवारांची पहिली यादी
1. सौ शितल कांडेलकर :- प्रभाग 3 (अ) ओबीसी महिला
2. श्री संतोष काळे :- प्रभाग 5 (अ) ओबीसी सर्वसाधारण
3. सौ श्रद्धा शेट्टी :- प्रभाग 6 (अ) अनुसूचित जाती
4. श्री शंकर थोरात :- प्रभाग 7 (ड) सर्वसाधारण
5. श्री विकास चव्हाण :- प्रभाग 8 (अ) अनुसूचित जाती
6. अँन अनिश :- प्रभाग 8 (क) सर्वसाधारण महिला
7. श्री सुदर्शन जगदाळे :- प्रभाग 9 (ड) सर्वसाधारण
8. सौ आरती करंजावणे :- प्रभाग 10 सर्वसाधारण महिला
9. अँड. कृणाल घारे :- प्रभाग 10 (ड) सर्वसाधारण
10. अँड. दत्तात्रय भांगे :- प्रभाग 11 (ड) सर्वसाधारण
11.श्री समीर आरवडे:- प्रभाग 19 (क) सर्वसाधारण
12. सौ मधू किरण कांबळे :- प्रभाग 22 (अ) अनुसूचित जाती महिला
13. श्री उमेश बागडे:- प्रभाग 23 (अ) अनुसूचित जाती
14. सौ विजया किरण कद्रे :- प्रभाग 23 (ब) ओबीसी महिला
15.श्री निरंजन अडागळे :- प्रभाग 26 (अ) अनुसूचित जाती
16. श्री अनिल कोंढाळकर:- प्रभाग 27 (ड) सर्वसाधारण
17.अँड अमोल काळे :- प्रभाग 31 (ड) सर्वसाधारण
18. श्री निलेश वांजळे प्रभाग 32 (ड) सर्वसाधारण
19. श्रीमती सुरेखा भोसले :- प्रभाग 32 (क) सर्वसाधारण महिला
20.श्री रमेश मते :- प्रभाग 33 (ड) सर्वसाधारण
21.श्री धनंजय बेनकर :- प्रभाग 34 (अ) ओबीसी सर्वसाधारण
22. श्री कुमार धोंगडे :- प्रभाग 39 (ड ) सर्वसाधारण
23. श्री गजानन भोसले :- प्रभाग 40 (ड) सर्वसाधारण
24. सौ प्रिया निलेश कांबळे :- प्रभाग 14 (अ) अनुसूचित जाती महिला
25. श्री प्रशांत कांबळे :- प्रभाग 38 (इ) सर्वसाधारण
