पुणे : महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे आयोजित एमईडीसी एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५–२६ ही एकदिवसीय परिषद मंगळवार दि.१७ डिसेंबर २०२५ रोजी ताज विवांता(हिंजवडी) येथे उत्साहात पार पडली.
सकाळी झालेल्या उद्घाटन सत्रात राज्य सरकारचे निवासी गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड,एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, एमईडीसीचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, उपाध्यक्ष सचिन ईटकर, ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ प्रसाद प्रधान,एमईडीसीचे प्रादेशिक संचालक प्रदीप कोपर्डेकर, माइंडवर्क्स ग्लोबल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक डॉ. संग्रामसिंह पवार, कॉमसेन्सचे अध्यक्ष सागर बाबर आणि कृष्णा डायग्नॉस्टिकचे चेअरमन राजेश मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ निशिकांत धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.
माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्यसेवा आणि जीसीसी क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योग नेते व धोरणकर्त्यांच्या उपस्थितीमुळे परिषद विशेष ठरली. महाराष्ट्रातील वेगाने वाढणाऱ्या क्षमता इकोसिस्टममध्ये सहकार्य, ज्ञानविनिमय आणि नवोन्मेषाला चालना देणे हा परिषदेचा मुख्य उद्देश होता .नव उद्योजक,व्यावसायिक,स्टार्ट अप संचालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
'भारतातील प्रतिभेचा सर्वात मोठा समूह म्हणजे जवळपास, महाराष्ट्रातील ८० टक्के लोकसंख्या म्हणजे साधारण १५ ते ५९ वर्षांच्या वयोगटातील कुशल मनुष्यबळ आपल्या इथे अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत आहे, नव तंत्रज्ञान,नवोन्मेष आणि प्रगत धोरणांचा फायदा घेऊन जागतिक स्तरावर स्टार्ट अप,नव उद्योजकांनी ठसा उमट'वावा,भारताची अर्थव्यवस्था ट्रिलियन मध्ये गणली जावी आणि त्यात महाराष्ट्राचे योगदान असावे ,असे आवाहन या वेळी राज्य सरकारचे निवासी गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड यांनी केले. पुण्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध असल्याने पुणे हे भारतातील एक मोठे आयटी हब बनले आहे. पुणे आणि मुंबई येथे सर्वाधिक स्टार्टअप म्हणजे ३४ हजार कंपन्या सुरू झाल्या आहेत, आणि त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात डिजिटल विकासात पुणे -मुंबई येथील उद्योजकांची भूमिका भारताच्या दीर्घकालीन विकासात महत्त्वाची राहील"
एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड म्हणाले,'राज्यातील औद्योगिक विकासासाठी एमआयडीसीने ३५ प्रकारच्या सेवा पोर्टल द्वारे देणे सुरु केले आहे.एमआयडीसी तील भूखंड जागाही ऑनलाईन अर्ज करून महिनाभरात मिळतात.महाराष्ट्रात येत्या काळात नवनवीन उद्योग उभारणी मोठ्या प्रमाणात होणार असल्याने अधिकाधिक कुशल तंत्रज्ञानयुकत मनुष्यबळ विकसित करणे, तयार करणे आणि त्याद्वारे अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देणे यावर येत्या काळात आमचा अधिक भर असेल .पुण्याचा विचार केल्यास पुण्यात पाणी, वीज आणि कुशल मनुष्यबळ भरपूर आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने पुण्याचा सर्वांगीण विकास येत्या काळात अधिक होईल यात शंका नाही,
'पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक आणि संभाजी नगर या पाच रिजन बेस विकासावर भर देणे हे आमचे प्रमुख ध्येय असून या द्वारे संपूर्ण राज्यभर नवे कुशल तंत्रज्ञानयुक्त मनुष्यबळ विकसित करणे आणि नवनवीन कामाच्या संधी निर्माण करणे ही भूमिका राहील. आणि विशेष करून पुण्या सारख्या आयटी हब बनलेल्या शहराचा जीडीपी वाढविण्यासाठी आणि त्याचा देशाच्या विकासाला हातभार लावणे , हे आमचे प्रमुख उद्देश आहे', असे मत एमईडीसीचे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी व्यक्त केले. "आजच्या परिषदेमळे राज्यभरातील सर्व लहान मोठे उद्योजकांना एकमेकांना जोडणे आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार पर्यंत पोचविण्यासाठी हे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे" असेही मत शिरोडकर यांनी व्यक्त केले.
'आजचे युग हे एआयचे युग असल्याने सर्व क्षेत्रात डिजिटली विकास होणे आवश्यक असल्याने, आपल्या सर्व उद्योजकांना डिजीटली ज्ञानाने अद्ययावत असावे लागेल असे मत ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ डॉ.प्रसाद प्रधान यांनी व्यक्त केले.तसेच आपण आपल्या सुरक्षित झोन मधून बाहेर येऊन नवनवीन रिस्क घेणे नवीन जबाबदारी घेत संशोधनात्मक दृष्टीकोन बाळगणे आवश्यक असल्याचेही मत प्रधान यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांचे अनुभव कथन*
उद्घाटनानंतर महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या संधी या विषयावर मुख्य भाषण झाले. त्यानंतर विविध देशांतील तज्ज्ञांच्या सहभागातून चार ज्ञानसमृद्ध सत्रे पार पडली. एआय फॉर एमएसएमईज आणि जागतिक विस्तार या विषयावरील पहिल्या सत्रात सिंगापूर, जपान, इंग्लंड आणि जर्मनीतील उद्योगतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जीसीसी, एआय, फिनटेक आणि हेल्थकेअरमधील आव्हाने आणि संधी या विषयावरील दुसऱ्या सत्रात उद्योगक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांनी आपले अनुभव मांडले.
दुपारनंतर झालेल्या तिसऱ्या सत्रात आरोग्यसेवेमधील एआय आणि तंत्रज्ञान या विषयावर यूएई, पुणे आणि देशातील आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सखोल चर्चा केली. चौथ्या सत्रात एआय, आयटी आणि हेल्थकेअर क्षेत्रातील क्षमता बांधणीवर विचारमंथन झाले. समारोप सत्रात राजेश मुथा आणि डॉ. गिरीश देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिषदेचा समारोप हाय टी आणि नेटवर्किंगने करण्यात आला.