उरण : शिव प्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या संकल्पनेतून करंजाडे मधील महिलांसाठी लाठी काठी स्पर्धा ठेवण्यात आले होते. या स्पर्धा मोठ्या आनंदमय वातावरणात संपन्न झाल्या.ह्या कार्यक्रलाला मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलींनी सहभाग घेतला होता. ह्या वेळी शिव प्रतिष्ठान व शिव मावळे प्रतिष्ठान स्थापन करण्यामागील एकच हेतू आहे की समाजातील महिलांनी स्वतःच रक्षण स्वतः कसे करावे हे ह्यातून साध्य करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला शिव प्रतिष्ठान अध्यक्ष सत्यजित पाटील,सुनील अंबावडे, संदीप पाटील, अविनाश ठोसर, राकेश कुसळे, सुरेश बार्वे, अमर कुसळे, पवार सर , रोहन शिर्के, शंतनू कदम, दिपक चौधरी, आनंद पुजारी, अथर्व घाडगे, ओंकार आदी मान्यवर उपस्थित होते.
ह्या वेळेस सत्यजित पाटील यांनी सांगितले कि करंजाडे मधील महिलांना लाठी काठी प्रक्षिक्षण देऊन स्वतःच स्वतःच रक्षण कसे करता येईन तसेच जर कोणी महिलांसोबत असभ्य वर्तन करेल तर शिव मावळे त्याचा चौरंग करतील.असे सांगत सत्यजित पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.दिवसेंदिवस दररोज मुंबई, पुणे यासारख्या शहरातून दररोज ३ ते ४ मुली गायब होत आहेत. अनेक मुलींवर, महिलांवर अन्याय केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर लहान मुली व महिलांवर होणाऱ्या अन्यायाला, अत्याचारला विरोध करण्यासाठी मुलींना व महिलांना आत्मनिर्भर व सक्षम बनविण्याच्या दृष्टीकोणातून मुलींसाठी व महिलांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
