सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
  • पुण्यात शिंदे गटात दुफळी, धंगेकर 165 जागांवर ठाम तर भानगिरे भाजपकडे फक्त 35-40 जागा मागण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे कोणाचं ऐकणार?
  • जिथे शिवसेना जिंकली, ती जागाही आम्हालाच हवी, भाजपने बंडखोर आणि नंबर दोनचे गणित मांडलं, नव्या पॅटर्नने शिंदेसेना बुचकळ्यात
  • भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही नाही
 जिल्हा

वीर वाजेकर महाविद्यालयात कौशल विकास मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    18-12-2025 10:38:41

उरण : रयत शिक्षण संस्थेच्या, वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, फुंडे "कौशल विकास मार्गदर्शन" कार्यशाळा मोठया उत्साहात संपन्न झाले.बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व १८ ते ३० वयोगटातील सर्व तरुणांना नोकरीसाठी आवश्यक ते विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण वीर वाजेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे, याबद्दल माहिती करून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 
 
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य  डॉ. आमोद ठक्कर  यांनी विद्यार्थ्यांना आजच्या काळात व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सिनियर प्रोग्राम असोसियट नितीन अंब्रूले यांनी त्यांच्या मार्फत घेतले जाणाऱ्या  कोर्स बद्दल ची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच हे सर्व कोर्स मोफत कॉलेज मध्येच सुरु करण्याबद्दल ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जयवंती गोंधळी यांनी नर्सिंग कोर्स व हॉस्पिटॅलिटी कोर्स बद्दल ची पूर्ण माहिती तसेच कोर्स पूर्ण झाल्यानंतर जॉब मिळण्याचे आश्वासन दिले.पुष्पा गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना मल्टी फ्ंकशनल ऑफिस अटेंडट कोर्स मध्ये कॉम्प्युटर, संभाषण, रेकॉर्ड, खरेदी  इत्यादी सर्व बाबतीचे  दिले जाणारे प्रशिक्षण याबद्दलची माहिती दिली. या प्रसंगी १५०  विद्यार्थी, माजी  विद्यार्थी व गरजू युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. झेलम झेंडे  यांनी केले. सूत्र संचालन प्रा. प्रांजल भोईर यांनी व आभार प्रा. भूषण ठाकूर यांनी केले.
 


 Give Feedback



 जाहिराती